Pak vs Eng T20 World Cup Final: भारत आणि न्यूझीलंडला पराभूत करत पाकिस्तान आणि इंग्लंड (Pak vs Eng Final) हे दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचले आहेत. येत्या 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर हा हायव्होल्टेज सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे आता क्रिकेटप्रेमी या सामन्यात उत्सुक आहेत. अशातच आता पाकिस्तान इंग्लंड फायनलपूर्वी आयसीसीने ( t20 world cup final icc announcement) एक मोठी बदल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फायनल सामन्यापूर्वी आयसीसीने फायनलच्या प्लेईग कंडीशनमध्ये (Change in Playing Conditions) बदल केले आहेत. रविवारी होणाऱ्या या सामन्यावर पावसाचं संकट (Rain Threat) आहे. अशा परिस्थितीत हवामान लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणजेच (ICC) आयसीसीच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने राखीव दिवसासाठी अतिरिक्त वेळेत वाढ केली आहे.


आयसीसीने एक निवेदन जाहीर केलं आहे. सामना पूर्ण करण्यासाठी आणि निकाल लागण्यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्यास त्यावेळी राखीव दिवसाचा अतिरिक्त खेळण्याचा वेळ दोन ते चार तासांपर्यंत वाढवला जाऊ शकतो, असा निर्णय इव्हेंट टेक्निकल कमिटीने ( ICC ETC) म्हणजेच ईटीसीने घेतला आहे.


आणखी वाचा - T 20 World Cup Final : इंग्लंड-पाकिस्तान वर्ल्ड कप फायनल रद्द होणार?


दरम्यान, साखळी सामन्यांमध्ये निकालासाठी किमान 5 ओव्हर खेळणं आवश्यक असतं, तर नॉक आऊट सामन्यात किमान 10 ओव्हरच्या खेळानंतरच सामन्याचा निकाल लावणं शक्य आहे. फायनल सामन्यात 95 टक्के पाऊस पडण्याची शक्यता (Rain Threat in T20 World Cup Final) वर्तविण्यात येत असल्याने आता फायनलचा सामन्यावर सर्वांचं लक्ष आहे.