कॅनबेरा : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यात टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी (T 20 World Cup Final 2022) अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्याला रविवारी 13 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजून 30 मिनीटांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbounre Cricket Ground) सुरुवात होणार आहे.  या महामुकाबल्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्यासाठी कमालीची उत्सूकता पहायला मिळतेय. (pak vs eng t20 world cup final pakistan vs england head to head records)


आकडेवारी कुणाच्या बाजूने?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड आणि पाकिस्तान टी 20 क्रिकेटमध्ये एकूण 28 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये इंग्लंडचा बोलबाला राहिला आहे. इंग्लंडने 18 वेळा विजय मिळवलाय. तर पाकिस्तानला फक्त 9 सामन्यात विजय मिळवता आलाय. तर एक सामना अनिर्णित राहिलाय. तसेच टी 20 वर्ल्ड कपमध्ये उभयसंघ वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या दोन्ही सामन्यात इंग्लंडने पाकिस्तान धुव्वा उडवला होता.  


अंपायर कोण असणार? 


मरायस इरास्मस आणि कुमार धर्मसेना हे 2 अंपायर या मोठ्या सामन्यात अंपायरिंग करणार आहेत. 


टीम पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, हैदर अली, आसिफ अली, फखर जमां, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, शाहीन शाह आफरीदी आणि शान मसूद. 


टीम इंग्लंड : जॉस बटलर (कॅप्टन), मोईन अली, एलेक्स हेल्स, हॅरी ब्रुक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल राशिद, फिल साल्ट, बेन स्टोक्स, टायमल मिल्स, डेविड विली, ख्रिस वोक्स आणि मार्क वूड.