Pak vs NZ Series Viral Video: पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान पाकिस्तानमध्ये खेळवण्यात आलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला. या विजयासहीत दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकल्याने मालिका 2-2 च्या बरोबरपरीत सुटली. मात्र या सामन्यादरम्यान घडलेला एक विचित्र प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानेच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 


न्यूझीलंडचा पराभव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाहोरमध्ये झालेल्या मालिकेतील अंतिम टी-20 सामन्याचा निकाल अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये लागला. शेवटच्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी 12 धावांची गरज असताना हा सामना पाकिस्तानने 9 विकेट्सने जिंकला. न्यूझीलंडचे बेन सिआर्स आणि विल रुकी हे दोघेही धावबाद झाले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 178 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 19.2 ओव्हरमध्ये 169 धावांमध्ये तंबूत परतला. मात्र या सामन्यामध्ये न्यूझीलंडचा संघ अगदी सुरुवातीपासून अगदी समाधानकारकरपणे धावांचा पाठलाग करत होता. 


त्या विचित्र बॉलची चर्चा


न्यूझीलंडचा सलामीवीर टीम सीफर्टने 33 बॉलमध्ये 52 धावा केल्या. मात्र फलंदाजीदरम्यान पॉवरप्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजेच सहाव्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडची धावसंख्या 54 वर एक बाद अशी असताना मोहम्मद आमीरने टाकलेला बॉल खेळण्याच्या नादात टीम सीफर्टला पार डाइव्ह मारावी लागली. मात्र आमीरने टाकलेला बॉल एवढा बाहेरुन गेला की अगदी उडी मारुन संपूर्ण बॅट लांब करुन बॅटने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न करणारा टीम सीफर्ट अगदी क्रिजवर पडला पण त्याला बॉल मारता आला नाही. या जीव तोडून केलेल्या प्रयत्नाचा व्हिडीओ पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने आपल्या एक्स (ट्वीटर) हॅण्डलवर पोस्ट केला आहे. 



या व्हिडीओवर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.



...अन् डावाला घरघर लागली


न्यूझीलंडच्या संघाला घरघर लागली ती फिरकीपटू उस्मान मीरने 21 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्यामुळे. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने 30 धावा देत 4 विकेट्स घेत मधल्या फळीला सुरुंग लावला.  जॉश कार्लसनने 26 बॉलमध्ये नाबाद 38 धावा करत एका बाजूने किल्ला लढवत ठेवला. मात्र दुसरीकडून त्याला फारशी कोणी साथ दिली नाही. त्यामुळे पाहुण्या संघाला या टी-20 मालिकेचा चषक वाटून घ्यावा लागला.


नक्की वाचा >> World Cup: जहीरच्या 'टीम इंडिया'त एकही अंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू; संपूर्ण संघ पाहून बसेल धक्का


बाबरची उत्तम खेळी


त्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने 44 बॉलमध्ये 69 धावांची खेळी केली. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या डावाच्या उत्तरार्धामध्ये टिचून गोलंदाजी करुन पाकिस्तानी संघाला 200 धावांच्या आत रोखलं. मालिका बरोबरीत सुटल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल ब्रेसवेलने योग्य निकाल लागल्याचं मत व्यक्त केलं. तसेच त्याने त्याच्या संघाचं कौतुक करत संघाच्या झुंजार वृत्तीचा उल्लेख केला.