टी-20 विश्वचषक-2022 चा (T20 world cup 2022) पहिला उपांत्य फेरीच्या (semi final) सामन्यात पाकिस्तानाने न्यूझीलंडचा (pak vs nz) पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने गट-2 मध्ये दुसरे स्थान मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या जोरावर पाकिस्तानी संघाने शानदार विजय मिळवला. (PAK vs NZ Wasim Jaffer share MEME on Babar Azam and Mohammad Rizwan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विजयानंतर पाकिस्तानात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. मात्र पाकिस्तानच्या या विजयानंतर भारताचा माजी फलंदाज वसीम जाफर (wasim jaffer) यानेही ट्विट करत पाकिस्तानी संघाच्या विजयावर प्रतिक्रिया दिलीय. सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असणाऱ्या वसीम जाफरने पाकिस्तानच्या विजयानंतर मजेशीर मीम शेअर केलय.


आइये आपका इंतजार था... देर लगी आने में तुमको, शुक्र है फिर भी आए तो... या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत जाफरने बाबर आझम- मोहम्मद रिजवान या  जोडीसाठी मीम ट्विट केले आहे. पाकिस्तानचे हे दोन्ही दिग्गज फलंदाज  टी- 20 विश्वचषक 2022 मध्ये खूप संघर्ष करताना दिसले. सुपर-12 मध्ये दोघांच्या कामगिरीनंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी या दोघांनी एकत्र डावाची सुरुवात करू नये, असे म्हटले होते. पण सेमीफायनलच्या सामन्यात बाबर आणि रिझवान दमदार खेळी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.



पाकिस्तानकडून बाबर आझमने 53, मोहम्मद रिझवानने 57 आणि मोहम्मद हॅरिसने 30 धावा केल्या. या फलंदाजांच्या जोरावरच पाकिस्तान संघाला अंतिम फेरी गाठता आली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही त्यामुळे पाकिस्तानसमोर हा संघ फ्लॉप ठरला.


दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 4 बाद 152 धावा केल्या. पाकिस्तानने 153 धावांचे लक्ष्य 19.1 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाचा सामना 13 नोव्हेंबर 2022 रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. तर  अंतिम सामना हा गुरुवारी होणार आहे.