नवी दिल्ली : भारतीय संघाविरुद्ध झालेल्या आयसीसी वर्ल्डकप सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला होता. या पराभवानंतर पाकिस्तानातून पाकिस्तानी संघावर टीका सुरु आहे. पाकिस्तानी क्रिकेटर्सची हुक्का पार्टी देखील चांगलीच वादात सापडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका माजी पाकिस्तानी क्रिकेटरने म्हटलं की, शोएब मलिकने आता हे स्विकारलं पाहिजे की, त्याचं करिअर आता संपलं आहे.' 37 वर्षाच्या मलिकने वर्ल्डकपनंतर वनडेमधून निवृत्ती घेऊन पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 सामन्यासाठी लक्ष द्यावं.'


मलिकने वर्ल्ड कपमधील 3 सामन्यांमध्ये फक्त 8 रन केले आहेत. भारता विरुद्धच्या सामन्यात तर तो एकही रन करु शकला नाही. माजी टेस्ट स्पिनर इकबाल कासिमने म्हटलं की, 'मलिकने स्वत:च म्हटलं होतं की, वर्ल्डकप नंतर तो वनडेमधून निवृत्ती घेईल. त्याची कामगिरी पाहता मला नाही वाटत की पुढच्य़ा 4 सामन्यामध्ये मलिकला संधी दिली जाईल.'


शोएब मलिकने 35 टेस्ट, 287 वनडे और 111 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. पाकिस्तानसाठी 1999 मध्ये वनडेमध्ये त्याने पदार्पण केलं होतं. मलिकने आतापर्यंत 7534 रन केले असून 158 विकेट घेतले आहेत.


माजी क्रिकेटर मोहम्मद युसूफने म्हटलं की, मला वाटतं पाकिस्तानसाठी त्याचं करिअर संपलं आहे. पुढच्या सामन्यांमध्ये त्याला संधी मिळणं अवघड आहे. परत टीममध्ये सहभागी करणं मोठी चूक ठरेल.'


वर्ल्डकपमधील भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि त्याची पत्नी आणि बॅडमिंटनपटू सानियाचा एक नाईटआउट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भारताच्या विरुद्ध झालेल्या सामन्याआधीचा हा व्हिडिओ असल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे.


पाकिस्तानी खेळाडूंच्या खराब कामगिरीनंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर हुक्का पार्टी करत असताना दिसत आहेत.