IPL 2023 : आयपीएल की BBL? कोण भारी? Babar Azam म्हणतो...
Babar Azam: पाकिस्तानचा कर्णधार (Pakistan Captain) बाबर आझम प्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग (IPL) पेक्षा ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग (BBL) पाहण्यास प्राधान्य देतो.
Babar Azam Prefers BBL over IPL: सर्वांना प्रतिक्षा असलेल्या आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामाला येत्या 31 मार्चपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे आता सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, आयपीएलचा वाढता प्रभाव पाकिस्तानी खेळाडूंच्या पचनी पडत नसल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) याने आयपीएलवर बोलताना मोठं वक्तव्य केलंय.
पेशावर झल्मी पॉडकास्टवर एका प्रश्नाचे उत्तर देताना बाबरने हे उत्तर दिलं. IPL की BBL? कोण भारी? कोणत्या संघासह खेळायला आवडेल, असा सवाल बाबरला विचारण्यात आला होता. त्यावेळी बोलताना त्याने BBL म्हणजेच Big Bash League ला प्राधान्य दिलंय. त्याचा व्हिडिओ पाकिस्तान संघाच्या ऑफिशियल ट्विटर (Cricket Pakistan) हॅडलवर शेअर करण्यात आला आहे.
काय म्हणाला Babar Azam?
ऑस्ट्रेलियातील परिस्थिती वेगळी आहे. तिथल्या खेळपट्ट्या खरोखरच वेगवान आहेत आणि तुम्हाला खूप काही शिकायला मिळते. तर आयपीएलमध्ये तुम्हाला समान आशियाई परिस्थिती मिळते, असं बाबर आझम म्हणाला आहे.
बाबर सध्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये पेशावर जाल्मी संघाचं (Peshawar Zalm) नेतृत्व करतोय. बाबरची आयपीएलवरील कमेंट सोशल मीडियावर व्हायरल झालीये. ज्यामुळे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यामुळे त्याला त्याच्याच सोशल मीडियावर ट्रोलिंगचा (Babar Azam Troll On Social Media) सामना करावा लागतोय.
पाहा Video -
पाकिस्तानी खेळाडू आयपीएल खेळलेत...
2008 च्या पहिल्या आयपीएलच्या हंगामात काही पाकिस्तानी खेळाडूंनी आयपीएलमध्ये सहभाग घेतला होता. 2008 च्या हंगामात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीरने पर्पल कॅप जिंकून राजस्थान रॉयल्सला आयपीएलचा कप जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती.
आयपीएलमध्ये खेळलेले पाकिस्तानचे खेळाडू (Pakistan players who have played in the IPL)
1. सलमान बट - कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
2. शोएब मलिक - दिल्ली डेअरडेव्हिल्स (DD)
3. शोएब अख्तर - कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
4. मोहम्मद हाफिज - कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
5. मिसबाह उल हक - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)
6. मोहम्मद आसिफ - दिल्ली डेअरडेव्हिल्स (DD)
7. सोहेल तन्वीर - राजस्थान रॉयल्स (RR)
8. कामरान अकमल - राजस्थान रॉयल्स (RR)
9. युनूस खान - राजस्थान रॉयल्स (RR)
10. उमर गुल - कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
11. शाहिद आफ्रिदी - डेक्कन चार्जर्स (DC)
12. अझहर महमूद - कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP)