Babar Azam PSL : पाकिस्तानमध्ये सध्या पीएसएल म्हणजे पाकिस्तान सुपर लीगचा  (Pakistan Premier League) आठवा हंगाम खेळवला जात आहे. स्पर्धेत एकाहून एक चुरशीचे सामने पाहिला मिळतायत, पण त्याचबरोबर नवनवे वादही रंगातना दिसतायत. पीएसएल आणि वाद असं जणू समीकरणचं पाहिला मिळतं. असाच एक प्रकार क्रिकेट चाहत्यांना पुन्हा पाहिला मिळाला. पेशावर झालमी (Peshawar Zalmi) आणि इस्लामाबाद युनायटेडदरम्यान (Islamabad United) सामना रंगला होता. या सामन्यात एक धक्कादायक प्रकार घडला 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भर मैदानात बाबर आझम संतापला
इस्लामाबाद युनायटेडने हा सामना सहज जिंकला. पण त्याआधी सामन्यात क्रिकेट चाहत्यांना एक धक्कादायक प्रकार पाहिला मिळाला. भर मैदानात पेशावर झालमीचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) संतापला आणि चक्क बॉलरच्या मागे बॅट घेऊन त्याला मारण्यासाठी धावाल. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


23 फेब्रुवारीला कराचीमधल्या नॅशनल स्टेडिअमवर पेशावर आणि इस्लामाबाद दरम्यान सामना रंगला होता. इस्लामाबादचा कर्णधार शादाब खानने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिली फलंदाजी करणाऱ्या पेशावरची सुरुवात दणक्यात झाली. बाबर आझम आणि मोहम्मद हॅरिसने पहिल्या सात षटकातच दहाच्या रनरेटने 76 धावा केल्या. या सामन्यात बाबर आझमने 75 धावा केल्या. पण यावेळी एक अजब घटना पाहिला मिळाली.


इस्लमाबादकडून हसन अली गोलंदाजी करत होता, बाबर आझमच्या एका चेंडूनवर बाबर आझमने एक धाव घेतली. पण धाव घेताना बाबर आझमने चक्क हवेत बॅट उगारली आणि हसन अलीच्या मागे धावला. हसन अली तात्काळ तिथून बाजूल झाला. हा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. वास्तविक बाबर आझम बॅटने मारण्यासाठी नाही तर त्याने हसन अलीबरोबर मस्करी केली. 



इस्लामाबादने पेशावरला चारली धूळ
बाबर आझमच्या पेशावरने पहिली फलंदाजी करत इस्लामाबादसमोर विजयासाठी 159 धावांचं आव्हान ठेवलं. विजयाचं आव्हान समोर ठेवून मैदानात उतरलेल्या इस्लामाबादची सुरुवात दणक्यात झाली. सलामीला आलेल्या रहमानुल्लाह गुरबाजने (Rahmanullah Gurbaz) संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. गुरबाजने अवघ्या 31 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकार मारत 62 धावा केल्या. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या वॅन डेर ड्यूसेनने 42 धावा केल्या. यामुळे पंधराव्या षटकातच इस्लामाबादने विजय मिळवला.