मुंबई : सोशल मीडियाच्या वर्तुळात अनेकांनीच या माध्यमाचा फायदा करुन घेला आहे. सेलिब्रिटी, कलाकार, खेळाडू यांच्यात आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये असणारी दरीसुद्धा याच माध्यमातून कमी होते. पण, याच माध्यमावर सक्रिय असणाऱ्या एका पाकिस्तानी क्रिकेटपटूला मात्र याचा काहीसा वेगळा प्रत्यय आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या क्रिकेट संघासाठी आतापर्यंत जवळपास १२१ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळणाऱ्या उमर अकमल याने केलेलं एक ट्विट (ट्विटचा स्क्रीनशॉट) सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 


उमरने बुधवारी अब्दुल रझाकसोबतचजा एक फोटो पोस्ट केल्याचं म्हटलं जात आहे. त्याने फोटो पोस्ट करण्यापर्यंत आणि त्यावर कॅप्शन देण्यापर्यंतही ठीक होतं. पण, कॅप्शन देण्याचा त्याचा अंदाज किंबहुना शब्दांच्या मांडणीमध्ये झालेल्या एका चुकीमुळे त्याला नेटकऱ्यांनी लगेचच धारेवर धरलं. 


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका स्क्रीनशॉटमध्ये उमरचं हे ट्विट पाहायला मिळत आहे. जेथे, एका चुकीमुळे त्याची बरीच खिल्ली उडवण्यात आली. 'ब्रदर फ्रॉम अनदर मदर', असं उमरने लिहिणं अपेक्ष्त होतं. पण, या फोटोमध्ये दिसत असल्यानुसार त्याने 'मदर फ्रॉम अनदर मदर' असं लिहिल्याचं म्हटलं गेलं. शब्दांच्या मांडणीत झालेल्या या बदलामुळे वाक्याचा अर्थच बदलून गेला.





वाचा : शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'


उमरची ही चूक लगेचच सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली. ज्यानंतर कोणी उमर अकमलच्या इंग्रजीवर निशाणा साधला. तर, कोणी त्यानेच केलेल्या काही पोस्ट प्रकाशात आणत त्यावरुन त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये त्याच्या चुकांपासून काही पोस्टही सर्वांचं लक्ष वेधून गेल्या. मुख्य म्हणजे या चुका अधोरेखित करणाऱ्या नेटकऱ्यांना उमर काय उत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.