Pakistan Cricket : पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये का हारला? भारतावर खापर फोडत पाकड्यांनी लावला जावई शोध, म्हणतात...
Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी बेताल वक्तव्य करत पाकिस्तानचं पुन्हा एकदा हसू केलंय. खेळाडूंभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील एक प्रमुख कारण आहे, असा आरोप मिकी आर्थर (mickey arthur) यांनी केला आहे.
Pakistan in World Cup 2023 : वर्ल्ड कपच्या (World Cup 2023) इतिहासात कधी नव्हे ती सुमार कामगिरी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून (Pakistan Cricket Team) पहायला मिळत आहे. आतापर्यंत पाकिस्तानी संघाने 7 सामने खेळले असून त्यातील पहिले दोन सामने अन् मागील बांगलादेशविरुद्धचा सामना वगळता इतर सामने जिंकता आले नाहीत. त्यामुळे आता पाकिस्तानचा सेमीफायनलमधील (Semi final qualification Scenario For Pakistan) रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे. अशातच आता पाकिस्तानने वर्ल्ड कपमधील पराभवाचं खापर भारतावर फोडलं आहे. ज्याचं करावला जावं भलं, तो म्हणतो माझंच खरं, अशा पाकिस्तानची गत झाल्याने आता सोशल मीडियावर पाकिस्तान संघाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचे संचालक मिकी आर्थर (Mickey Arthur) यांनी बेताल वक्तव्य करत पाकिस्तानचं पुन्हा एकदा हसू केलंय. सध्याच्या विश्वचषक (ODI World Cup 2023) मधील संघाच्या निराशाजनक कामगिरीसाठी खेळाडूंभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील एक प्रमुख कारण आहे, असा आरोप मिकी आर्थर यांनी केला आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे खेळाडू हॉटेलच्या खोल्यांमध्ये बंदिस्त झाले आहेत, असंही मिकी आर्थर यांनी म्हटलंय.
नेमकं काय म्हणाले मिकी आर्थर?
आमच्यासाठी सर्वात कठीण परिस्थिती म्हणजे कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे आणि खरे सांगायचे तर मला ही कठीण परिस्थिती वाटत आहे. जणू काही आम्ही पुन्हा एकदा कोविडच्या युगात परतलो आहे. तुम्ही तुमच्या मजल्यापर्यंत आणि हॉटेलमधील तुमच्या टीमच्या खोलीपुरते मर्यादित असाल तर वेगळी भावना असते. आमचा नाश्ताही इतरांपासून वेगळ्या खोलीत असतो, इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असते. मात्र, आमच्या खेळाडूंना मुक्तपणे खेळण्याची सवय आहे, असं मिकी आर्थर यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात खेळाडूंना स्वतःच्या इच्छेने बाहेर जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देता आल्या नाहीत. त्यामुळे हे गुदमरल्यासारखे आहे, असं मत मिकी आर्थर यांनी मांडलं आहे.
आणखी वाचा - विराट कोहली जितक्या धावा ठोकेल तेवढं डिस्काउंट, बिर्याणी चक्क 7 रुपयाला!
दरम्यान, टीम रूममध्ये लहान मजेदार टीम इव्हेंट आयोजित करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तुम्ही इतकेच करू शकता का? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. खेळाडूंनी बाहेरच्या जगाचा आनंद घ्यावा अशी आमची इच्छा आहे, असं म्हणत मिकी आर्थर यांनी भारतावर पराभवाचं खापर फोडलं आहे.