मुंबई : खूप वर्षांपूर्वी टीव्हीला क्रिकेट खेळाडू युवराज सिंहची एक जाहिरात यायची. या जाहिरातीमध्ये क्रिकेट खेळातील अस्थिरता खूप स्पष्टपणे मांडली होती. युवराज सांगतो की, 'जेव्हापर्यंत या बॅट चालते तोपर्यंत ठिक आहे. पण जेव्हा बॅट चालणं बंद होईल, तेव्हा... 'युवराजचा हा डायलॉग एका चांगल्या क्रिकेटरला लागू होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानकरता प्रथम श्रेणीत क्रिकेट खेळलेल्या खेळाडूवर आज पिक-अपचा ट्रक चालवण्याची वेळ आली आहे. फजल सुभान असं या खेळाडूचं नाव आहे. फजल सुभान एकेकाळी राष्ट्रीय टीममध्ये चयनच्या जवळ होता. पण त्याच्या करिअरने अचानक अशी पलटी मारली की, आज त्याला घरखर्चासाठी पिक-अपचा ट्रक चालवावा लागत आहे. 31 वर्षांचा सुभान एकेकाळी पाकिस्तानच्या प्रथम श्रेणीत स्वतःची जागा निश्चित करून होता. सुभान पाकिस्तानच्या अंडर-19 टीममध्ये खेळला आहे. 



सुभानच्या मित्रांनी त्याची ही अवस्था जगासमोर यावी म्हणून त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत फजल मिनी पिक-अप ट्रक चालवताना दिसत आहेत. त्यामध्ये व्हिडिओत फजल सांगत आहे की, मी पाकिस्तानकरता खेळण्यासाठी खूप प्रचंड मेहनत केली आहे. डिपार्टमेंट क्रिकेटच्या दरम्यान मला 1 लाख पगार मिळत होता. पण आता डिपार्टमेंट बंद झालं आहे. त्यामुळे आता फक्त 30-35 हजार पगार मिळतो त्यामुळे दुसरा पर्याय नाही. 



सुभान यांनी म्हटलं की, मी आभारी आहे की, सध्या माझ्याकडे ही नोकरी आहे. कारण परिस्थिती अशी आहे की, पुढे ही नोकरी देखील राहिल की नाही कल्पना नाही. माझ्याकडे कोणता दुसरा पर्याय कारण मुलांसाठी मला हे करावं लागतं.