कराची : पाकिस्तान सुपर लीगमध्ये मिळणारी बक्षिसाची किंमत आणि आयपीएलमध्ये प्लेयर्सना मिळणाऱ्या किंमतीची तुलना केली जातेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएसएलमध्ये जिंकणाऱ्या टीमला ४ कोटी ५६ लाख रुपये मिळणार आहेत. तर दुसरीकडे अंडर १९ मध्ये खेळणारा खेळाडू जास्त किंमतीत विकला गेला. 


पाकिस्तानात विराटचे फॅन्स 


विराट कोहलीच्या नावाची सध्या क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा आहे. जगभरात विराटचे चाहते पाहायला मिळतात. पाकिस्तानलाही विराट नावाची भूरळ पडली आहे.


याचा एक पुरावा समोर आलाय. पाकिस्तान सुपर लीगमध्ये विराटला त्याचे फॅन्स खूप मिस करतायत. 


प्रेक्षकांमध्ये पोस्टर 


 २ मार्चला झालेल्या पीएसएलच्या मॅचमध्ये प्रेक्षकांमध्ये एक पोस्टर दिसला. ज्यामध्ये लिहिले होते, 'आम्हाला विराट कोहलीला पीएसएलमध्ये खेळताना पाहायच आहे.' 


सोशल मीडियावर खिल्ली 


दोन्ही देशातील क्रिकेट संबध सुधारावेत असे या प्रेक्षकांना सुचवायचे होते. पण सोशल मीडियावर याचा वेगळाच अर्थ काढला जातोय. कोहलीला खेळवणं पाकिस्तानला परवडणार नाही, अस म्हणत खिल्ली उडवली जात आहे.


कोहलीच्या सपोर्टमध्ये एका पाकिस्तानी फॅन्सने भारतीय झेंडा फडकल्याची मोठी किंमत त्याला चुकती करावी लागत आहे. १० वर्षाच्या शिक्षेची टांगती तलवार त्याच्या मानेवर आहे. 
 
किस्तान क्रिकेट लीगमध्ये ६ टीम खेळतायत. यातील ५ टीम्सनी एक ना एक मॅच तरी जिंकली आहे. पण एक टीम अशी आहे जी पाचही सामने हरली. 


फॅन्स नाराज 


'लाहोर कलंदर' नावाची ती टीम. ब्रॅंडम मॅक्युलम, सुनील नारायण, दिनेश रामदीन, उमर अकमल सारखे दिग्गज यामध्ये आहेत.


यांचे फॅन्स टीमचा विजय पाहण्यासाठी आतूर असतात. पण प्रत्येकवेळी या टीमच्या फॅन्सला नाराजीचा सामना करवा लागतो. पण यातील एक फॅन जास्तच तापला. त्याने टीम शॉपिंग वेबसाइटवर विकायला काढली. 


ईबेवर विक्रीस 


ईबे शॉपिंग साइटवरील जाहीरातीत सर्वात बेइज्जत करणारी म्हणजे त्याची विक्री किंमत. या टीमची विक्री किंमत १ हजार डॉलक म्हणजे ६५ रुपये इतके मुल्य ठेवण्यात आले.


यावर लिहिलेली एक अट हसण्यासारखी आहे. सर्व पार्ट ठिक आहेत पण एकपण ठिक काम करत नाही. म्हणजेच या टीममध्ये एकापेक्षा एक खेळाडू आहेत पण एकही चालत नाहीए. 


बातमी वाऱ्यासारखी पसरली 


 पाकिस्तानपासून भारतापर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ईबेकडून हे पेज गायब करण्यात आलय पण सोशल मीडियावरून कोण गायब करणार ? असा प्रश्न विचारला जातोय.