नवी दिल्ली : पाकिस्तानचा तेज तर्रार गोलंदाज मोहम्मद अब्बासची सध्या क्रिकेट जगतामध्ये चांगलीच चर्चा आहे. त्यानं सात कसोटी सामन्यात ३७ बळी घेण्याचा पराक्रम केलाय. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्यानं हा कारनामा केला. त्याच्या या कामगिरीमुळे अब्बासला पाकिस्तानचा नवा मोहम्मद आसिफ म्हणून संबोधलं जातंय. आसिफनंही सात कसोटीत पाकिस्तानकडून खेळताना ३७ बळी घेतले होते.  


यासिर शाहनंही अशीच कामगिरी केली होती. तर अब्दुर रहमान आणि शाबिर अहमेदनंही सात कसोटीत ३६ बळी घेण्याची किमया साधली होती.