मुंबई : २०१८ राष्ट्रकुल स्पर्धा नुकत्याच संपल्या आहेत. या स्पर्धेत पदकांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. यावर्षी भारतानं ६६ पदकं(२६ गोल्ड, २० सिल्व्हर आणि २० ब्रॉन्झ) जिंकली. यंदाची राष्ट्रकूल स्पर्धा ही भारताची तिसरी सगळ्यात यशस्वी स्पर्धा होती. २०१० साली दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं १०१ पदकं आणि २००२  साली मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या स्पर्धेत भारतानं ६९ पदकं जिंकली होती. मागच्यावेळी म्हणजेच २०१४ साली झालेल्या ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला ६४ पदकं मिळाली होती.


ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर राहिली. ऑस्ट्रेलियानं ८० गोल्ड, ५९ सिल्व्हर आणि ५९ ब्रॉन्झ अशी एकूण १९८ पदकं मिळवली. तर इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर राहिलं. इंग्लंडनं ४५ गोल्ड, ४५ सिल्व्हर आणि ४६ ब्रॉन्झ अशी एकूण १३६ पदकं मिळाली.


पाकिस्तान २४व्या क्रमांकावर


या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पाकिस्तान २४ व्या क्रमांकावर राहिला. पाकिस्ताननं एक गोल्ड आणि ४ ब्रॉन्झ अशी एकूण ५ पदकं जिंकली. पाकिस्तानचा कुस्तीपटू मुहम्मद इनाम बट यानं नायजेरियाच्या मेलविन बिबोचा ६-०नं पराभव केला.