मुंबई : येत्या एक जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होतेय. .या स्पर्धेत भारताचा पहिलाच मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चॅम्पियन्स ट्रॉफी ही मिनी वर्ल्डकप समजली जाते. वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत पाकिस्तान एकदाही भारताला हरवू शकला नाही. यासोबतच या मिनी वर्ल्डकप अर्थात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जिंकणे तर दूरच पाकिस्तान एकदाही फायनलमध्ये पोहोचू शकलेला नाही.


पाकिस्तान २०००, २००४ आणि २००९मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला मात्र पराभव झाल्याने त्यांना स्पर्धेतील गाशा गुंडाळावा लागला. याशिवाय इंग्लंड, बांगलादेश आणि झिम्बाब्वेलाही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आलेली नाहीये. 


स्पर्धेतील दोन गट
ग्रुप ए – ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड और न्यूझीलंड।
ग्रुप बी – भारत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका।


भारताचे सामने : –
4 जून- भारत वि पाकिस्तान
8 जून – भारत वि श्रीलंका
11 जून – भारत वि दक्षिण अफ्रीका