Jay Shah : वर्ल्ड कपदरम्यान पाकिस्तानला मोठा झटका
आशिया क्रिकेट काउन्सिलचे चेयरमन आणि बीसीसीआय सचिव (Bcci) जय शाह (Jay Shah) यांनी मंगळवारी दिली.
मुंबई : बीसीसीआयने (Bcci) मोठा निर्णय घेतलाय ज्यामुळे एका झटक्यात पाकिस्तानला व्हॉल्ट्सचा झटका बसलाय. टीम इंडिया (Indian Cricket Team) 2023 मध्ये आशिया कप (Asia Cup 2023) खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही. याबाबतची माहिती आशिया क्रिकेट काउन्सिलचे चेयरमन आणि बीसीसीआय सचिव (Bcci) जय शाह (Jay Shah) यांनी मंगळवारी दिली. (pakistan not to be host asia cup 2023 says asian cricket council president and bcci secretary jay shah)
आशिया कप त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येईल, अशी माहिती शाह यांनी दिली. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (Pakistan Cricket Board) मोठा झटका बसलाय. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण (Agm) सभा पार पडली. या सभेनंतर पाकिस्तानकडे असलेलं आशिया कप 2023 चं यजमानपद काढण्यात आल्याचं शाह यांनी सांगितलं.
जय शाह काय म्हणाले?
"आशिया कप 2023 त्रयस्थ ठिकाणी खेळवला जाईल. केंद्र सरकार टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही, याबाबतचा निर्णय घेते. त्याबाबत आम्ही काहीच प्रतिक्रिया देणार नाही. मात्र आशिय कपचं आयोजन हे न्यूट्रस वेन्यूला होणार हे निश्चिकत आहे", अशी प्रतिक्रिया जय शाह यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्यासाठी तयार आहे. मात्र शाह यांनी या वृत्ताचं खंडन केलं. पुढील वर्षी होणाऱ्या आशिया कप स्पर्धा ही वनडे फॉर्मेटमध्ये खेळवण्यात येणार आहे.