नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये बॅट्समन किंवा बॉलर एखादा रेकॉर्ड करतो आणि त्याचं नाव चर्चेत येतं. पण, सध्या एका बॉलरचं नाव चर्चेत आहे ते म्हणजे त्याच्या उंचीमुळे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमध्ये एकापेक्षा एक असे  फास्ट बॉलर्स आहेत. सरफराज नवाजपासून इम्रान खान, वसीम अकरम, वकार यूनिस आणि शोएब अख्तर यांचा समावेश आहे.


भलेही आज पाकिस्तानकडे इम्रान आणि वसीम अकरम यांच्यासारखे फास्ट बॉलर्स नाहीयेत. मात्र, मोहम्मद आमिर सारख्या बॉलर्समध्ये आणखीन एका बॉलरचं नाव सध्या चर्चेत आहे.


पाकिस्तानचा शऊर अहमद सध्या आपल्या उंचीमुळे चर्चेत आहे. त्याची उंची जवळपास ७ फूट आहे. शऊर अहमद हा पाकिस्तानच्या अंडर-१९ टीमसाठी खेळतो. सध्या तो अंडर-१९ आशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट टीमचा हिस्सा आहे.



१८ वर्षांचा शऊर अहमद याची उंची ६ फूट ८ इंच आहे. शऊर हा राइट आर्म फास्ट बॉलर आहे. मात्र, असे असलं तरी पाकिस्तानकडे क्रिकेट विश्वातील सर्वात उंच बॉलरही आहे. मोहम्मद इरफान याची उंची ७ फूट १ इंच आहे.