नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याचे कोट्यावधी चाहते आहेत. विराटवर अनेक मुली प्रेम करतात. मात्र, आता अशी एक बातमी आली आहे ती ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेमसंबंधांबाबत अनेक चर्चा होतात आणि बातम्याही समोर येतात. असे असले तरी जगभरातील मुली विराटला प्रपोज करत असतात. मात्र, आता चक्क एका पुरुषाने विराटला लग्नासाठी प्रपोज केल्याचं वृत्त समोर आलं आहे.


प्रपोज करणारा व्यक्ती हा पोलीस असून तो पाकिस्तानमधील लाहोर येथील असल्याचं कळतयं. या पोलिसाने आपल्या हातात घेतलेला पोस्टरचा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.


पाकिस्तान आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यात तीन टी-२० मॅच खेळण्यात आल्या. शेवटची मॅच १५ सप्टेंबरला लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये खेळण्यात आली. वर्ल्ड इलेव्हन टीममध्ये एकही भारतीय प्लेयर नसताना पाकिस्तान क्रिकेट प्रेमींच्या हातात विराट आणि धोनीच्या नावाचे पोस्टर झळकत होते. यापैकीच एक पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झाला.


व्हायरल झालेल्या फोटोत लाहौरमधील एक पोलीस कर्मचारी पोस्टर घेऊन उभा दिसत आहे. या पोस्टरवर लिहीलं आहे की, "कोहली माझ्यासोबत लग्न कर". अशा प्रकारचे पोस्टर्स अनेकदा पाहिले आहेत मात्र, आता एका पुरुषाच्या हातात प्रपोजलचं पोस्टर दिसल्याने त्यावर अनेक कमेंट्स येत आहेत.




या पोस्टरसंदर्भात माहिती मिळू शकलेली नाहीये की, हा पोस्टर त्या पोलीस कर्मचाऱ्याचाच आहे की त्याने इतर कुणाचा पोस्टर हातात घेतला आहे. काही युजर्सच्या मते, काहींनी मस्करी करत हा पोस्टर पोलिसाकडे दिला आणि मग फोटो क्लिक केला.