वर्ल्डकप 1992 आणि 2019 मधला योगायोग, पाकिस्तान वर्ल्डकप जिंकणार?
पाकिस्तानची दोन वर्ल्डकपमधील समान कामगिरी
मुंबई : वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान सध्या चर्चेत आहे. कारण 1992 चा इतिहास पाकिस्तान पुन्हा एकदा घडवत आहे. 1992 चा वर्ल्डकप पाकिस्तानने जिंकला होता. त्यामुळे 2019 चा वर्ल़्डकप पाकिस्तान जिंकणार का अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. 1992 च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने ज्या प्रकारे वर्ल्डकपमध्ये कामगिरी केली होती. तशीच कामगिरी सध्या 2019 मध्ये देखील सुरु आहे.
1992 आणि 2019 वर्ल्डकपमधला पाकिस्तानचा एकसारखा प्रवास
वर्ल्डकप 1992
पहिला सामना - पाकिस्तानचा वेस्टइडिजकडून पराभव
दुसरा सामना - पाकिस्तानचा विजय
तिसरा सामना - पावसामुळे सामना रद्द
चौथा सामना - पाकिस्तानचा पराभव
पाचवा सामना - पाकिस्तानचा पराभव
सहावा सामना - पाकिस्तानचा विजय
सातवा सामना - पाकिस्तानचा विजय
वर्ल्डकप 2019
पहिला सामना - पाकिस्तानचा वेस्टइडिजकडून पराभव
दुसरा सामना - पाकिस्तानचा विजय
तिसरा सामना - पावसामुळे सामना रद्द
चौथा सामना - पाकिस्तानचा पराभव
पाचवा सामना - पाकिस्तानचा पराभव
सहावा सामना - पाकिस्तानचा विजय
सातवा सामना - पाकिस्तानचा विजय
पाकिस्तानने 1992 वर्ल्डकप मधला 7 वा सामना 49.1 ओव्हरमध्ये जिंकला होता. बुधवारी झालेल्या सामना देखील पाकिस्तानने 49.1 ओव्हरमध्ये जिंकला.