मॅचदरम्यान कॅच सोडल्याची एवढी मोठी शिक्षा कोण देतं? पाहा व्हिडीओ
मॅचदरम्यान पाकिस्तानच्या प्लेअरने सोडली कॅच, ज्याची त्याला एवढी मोठी शिक्षा मिळेल, याचा त्याने विचार देखील केला नव्हता
लाहोर : मॅचमध्ये फील्डरकडून कॅच सुटली तर त्याचा फटका संघाला बसतो आणि स्पर्धा अधिक चुरशीची होते. प्रत्येक कॅच आणि बॉल महत्त्वाचा असतो. त्यामुळे तो सुटला तर नुकसान होणं महत्त्वाचं असतं. मॅचमध्ये कॅच सुटली म्हणून फील्डरला खूप मोठी शिक्षा मिळाली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाकिस्तानच्या लाहोर इथे पाकिस्तान सुपर लीगचे सामने सुरू आहेत. या सामन्यात वेगवान गोलंदाज हॅरिस रऊफ भावनेच्या आहारी गेल्याचं पाहायला मिळालं. पेशावर जाल्मी विरुद्ध लाहोर कलंदर यांच्यात सामना सुरू होता. यावेळी फील्डरने कॅच सोडल्याने हॅरिस संतापलेला पाहायला मिळाला.
हॅरिसने संतापाच्या भरात फील्डरच्या कानशिलात लगावली. यावेळी त्याचा रौद्र अवतार मैदानात पाहायला मिळाला. त्यानंतर पाचव्या बॉलवर फवाद अहमदने कॅच पकडून फलंदाजाला आऊट केलं. या विकेटनंतर हारिस खूप आनंदी झाल्याचं पाहायला मिळाला.
पेशावर विरुद्ध लाहोर सामन्यात हॅरिस गोलंदाजी करायला आला. त्याच ओव्हरमध्ये धडाकेबाज फलंदाज हजरतुल्लाचा कॅच फील्डरने सोडल्यानं संताप अनावर झाला. त्यामुळे हॅरिस संतापल्याचं दिसलं.
विकेटच्या सेलिब्रेशनमध्ये हॅरिस कॅच सोडलेल्या फील्डरच्या कानशिलात खेचली. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा वाद तिथेच थांबवण्यात आला. नाहीतर मैदानात अनर्थ घडला असता. मात्र परिस्थिती नियंत्रणात होती.