मुंबई: क्रिकेटच्या मैदानात सरावा दरम्यान किंवा खेळाताना अनेक दुर्घटना घडून किंवा खेळाताना खेळाडू जखमी होत असतात. नेट प्रॅक्टीस दरम्यान फलंदाजाच्या तोंडावर बॉल लागून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात उपचारासाठी तातडीनं दाखल करण्यात आलं. या फलंदाजाच्या तोंडाला 7 टाके पडले आहेत. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून नर्सचे आभार मानेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे पाकिस्तान लीग स्थगित करण्यात आली होती. मात्र या लीगचे सामने बुधवारपासून पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. हे सामने सुरू होण्याआधीच लाहौर कलंदर्स संघाचा स्टार फलंदाज जखमी झाल्यानं संघाला मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू बेन डंकच्या तोंडाला बॉल लागून तो जखमी झाला आहे. त्याच्या तोंडाची सर्जरी करण्यात आली असून 7 टाके देखील बसले आहेत. 



विकेटकीपर आणि फलंदाज बेन डंकने 6 जून रोजी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. लीगच्या सरावा दरम्यान बेन डंक जखमी झाला होता. त्यांनी आपल्या ट्रिटमेंटनंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.



'माझ्या ओठांना नीट करून माझं मॉडेलिंगच्या स्वप्नांना जिवंत ठेवण्यात या नर्सचा मोठा वाटा आहे. त्यांचे मी खूप आभार मानतो' असंही बेन म्हणाला आहे. कलंदर्स टीम 9 जून रोजी अबूधाबीमध्ये इस्लामाद युनायटेड विरुद्ध सामना खेळणार आहे. या आठवड्याच्या शेवटी बेन पुन्हा संघात परतेल अशी सर्वांनाच आशा आहे.


कोरोनामुळे IPL 2021चे सामने देखील स्थगित करण्यात आले होते. हे सामने सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहेत. बीसीसीआयकडून संपूर्ण शेड्युल कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पहिल्या सत्रात बंगळुरू, दिल्ली, चेन्नई आणि मुंबई या चार संघांमध्ये कडवी लढत पाहायला मिळाली होती.