मुंबई : ICC T20 विश्वचषक 2021 मधून बाहेर पडल्याने पाकिस्तान क्रिकेट संघाला चांगलीच दमछाक होत आहे. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने बाबर आझमच्या सेनेचा 5 गडी राखून पराभव केला.


पाकिस्तानच्या आशेवर फिरलं पाणी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 176 धावा केल्या. मोहम्मद रिझवानने 67, फखर जमानने 55 आणि बाबर आझमने 39 धावांचे योगदान दिले. एवढी उत्कृष्ट फलंदाजीही पाकिस्तान संघाला कामी आली नाही.ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने २ तर पॅट कमिन्स आणि अॅडम झाम्पाने १-१ बळी घेतले.


पाकिस्तानला हरवून ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये 


प्रत्युत्तरात 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने अवघ्या 1 धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी डाव सांभाळताना 51 धावांची भागीदारी केली. वॉर्नरने 49 तर मार्शने 28 धावा केल्या. एक वेळ अशी आली की 96 धावांवर कांगारू संघाच्या 5 विकेट पडल्या. त्यानंतर पाकिस्तान हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण मार्कस स्टॉइनिस आणि मॅथ्यू वेडचे इरादे वेगळे होते. या दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवून दिला.



ट्विटरवर PAK टीमची खिल्ली 


आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. पाकिस्तानच्या या दारूण पराभवामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, ते सोशल मीडियावर मजेशीर पद्धतीने मीम्स शेअर करत आहेत. यातील काही निवडक ट्विटवर एक नजर टाकूया.