Pakistan tour of India for World Cup: भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपचं (ICC Men's ODI World Cup 2023) बिगुल 5 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर वाजणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणार आहे. तर भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. मात्र, सर्वांना प्रतिक्षा आहे ती, भारत पाकिस्तान सामन्याची (india vs pakistan). गेल्या काही दिवसांपासून वर्ल्ड कपचं शेड्यूल (World cup 2023 Schedule) जाहीर झालं असताना देखील पाकिस्तानचा संघ भारतात येणार की नाही? यावर मोठा प्रश्नचिन्ह होता. अशातच आता पाकिस्तान संघाचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कप तोंडावर आला असताना आता पाकिस्तान कोणता निर्णय घेणार? यावर अनेक चर्चा होत होत्या. अशातच आता मोठा पोकळ धमक्यानंतर पाकिस्तान सरकारने पीसीबी (PCB) अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आपला संघ भारतात पाठवण्याची अधिकृत परवानगी दिली नव्हती आहे. 


निवेदनात काय म्हटलंय?


पाकिस्तानने सातत्याने सांगितलं आहे की, खेळांना राजकारणात मिसळू नये. त्यामुळे आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये खेळण्यासाठी आम्ही आमचा क्रिकेट संघ भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा विश्वास आहे की, भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधांची स्थिती त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा-संबंधित जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या मार्गावर येऊ नये, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.



आणखी वाचा - रोहित शर्मा टी-ट्वेंटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार? World Cup 2023 आधी केला मोठा गोप्यस्फोट!


दरम्यान, पाकिस्तानमध्ये आशिया कपचं आयोजन होणार आहे. बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये आपला संघ पाठवण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. त्यानंतर पाकिस्तानने देखील भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपवर बहिष्कार घालणार असल्याचं बोललं होतं. मात्र, आता पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकले आहेत. पाकिस्तानचा क्रिकेट संघ आता वर्ल्ड कपसाठी भारतात येणार आहे.