Andrew Flintoff hospitalised after car crash : इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटर (England Cricketer) एंड्रयू फ्लिंटॉफ (Andrew Flintoff) याचा भीषण अपघात झाला आहे. बीबीसीचा टेलिविजन शो "टॉप गियर"च्या शूटींगदरम्यान त्याच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातानंतर त्याला एयरलिफ्ट (airlifted to hospital) करून रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ब्रिटीश मिडीयाच्या रिपोर्टनुसार, 45 वर्षीय फ्लिंटॉफला रूग्णालयात जाण्यापूर्वी घटनास्थळी त्याच्यावर उपचार करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लिंटॉफला झालेली दुखापत गंभीर आहे, मात्र तो धोक्याच्या बाहेर आहे. मंगळवारी दक्षिण लंडनच्या डनफोल्ड पार्क एयरोड्रममध्ये कार्यक्रमाच्या पीरक्षण ट्रॅकवर ही दुर्घटना घडली.


फ्लिंटॉफ इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. त्याला "फ्रेडी" या नावाने ओळखलं जातं. फ्लिंटॉफने वयाच्या 32 व्या वर्षी क्रिकेटला अलविदा केलं होतं. त्याने इंग्लंडकडून 79 टेस्ट खेळले होते. केवळ गोलंदाजीच नाही तर फलंदाजीमध्येही त्याने त्याचं नाणं खणखणीत बजावलं आहे. त्याने त्याच्या जीवावर इंग्लंडला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याच्या क्रिकेट करियरमध्ये 2005 आणि 2009 मध्ये इंग्लंडला एशेज जिंकण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 


क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर फ्लिंटॉफने हिट मोटरशो टॉप गियर सह-होस्टिंग म्हणून काम सुरु केलं होतं. हा शो खूप लोकप्रिय आहे. फ्लिंटॉफच्या अपघातानंतर बीबीसीच्या एका प्रवक्तांनी सांगितलं की, फ्रेडी आज सकाळी टॉप गियर परीक्षण ट्रॅकवर जखमी झाला आहे. दरम्यान त्याला घटनास्थली तातडीने उपचार देखील मिळाले. पुढच्या उपचारांसाठी त्याला रूग्णालयात नेण्यात आलं आहे.


कसं होतं फ्लिंटॉफचं करियर


79 टेस्ट सामन्यांमध्ये फ्लिंटॉफने 3845 रन्स आणि 226 विकेट्स घेतल होते. यामध्ये त्याच्या 5 शतकांची आणि 3 वेळा 5 विकेट्स घेण्याच्या कामगिरीची नोंद आहे. शिवाय वनडे सामन्यात फ्लिंटॉफच्या नावे 3394 रन्सची नोंद असून त्यामध्ये 3 शतकांचा समावेश आहे. सोबतच त्याने 169 विकेट्सही घेतले आहे. 7 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 5 विकेट्स काढले असून 76 रन्सची त्याच्या नावे नोंद आहे.