दुबई: टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्यात भारताचा पराभव झाला आहे. T20 World cup च्या भारताच्या पहिल्याच सामन्यात मोठं अपयश आलं आहे. टीम इंडियाच्या बोलर्सना पहिल्या 10 ओव्हर्समध्ये एकही विकेट घेण्यात यश मिळालं नाही. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिन आफ्रिदीने 3 विकेट्ल घेतल्या आहेत. त्यांची फिल्डिंगही मजबूत होती. रिझवान आणि बाबर आझमच्या सलामी जोडीनं आपल्या झंझावाती फलंदाजीनं मैदानात तुफान आणलं. दोघांच्या भागीदारीमध्ये 100 धावांचा पल्ला गाठला. बाबर आझमने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. 



बाबर आझमने 41 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 52 धावा केल्या. तर रिझवानने प्रत्येकी 2 चौकार आणि षटकारांच्या मदतीने 37 बॉलमध्ये 46 धावा केल्या. के एल राहुलने 3, रोहित शून्य, विराट कोहलीने 49 बॉलमध्ये 57 धावा केल्या. सूर्य कुमार यादवने 8 बॉलच्या मदतीने 11 धावा केल्या आहेत. ऋषभ पंत आणि विराट कोहलीने टीम 


इंडियाचा डाव सावरला. पंतने 2 चौकार आणि षटकारांच्या मदतीने 30 बॉलमध्ये 39 धावा केल्या. रविंद्र जडेजाने 13 बॉलमध्ये 13 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 8 बॉलवर 11 धावा केल्या आणि तोही तंबुत परतला. विराट कोहलीची विकेट शाहिनने काढली.