मुंबई : नुकत्याच झालेल्या T20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी चांगलीच राहिली. पाकिस्तान टीमने उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला. मात्र, निर्णायक सामन्यात पाकिस्तानचं त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. आता बाबर आझमची पाकिस्तान टीम बांगलादेश दौऱ्यावर आहे. शुक्रवारी त्यांच्यात पहिला टी-20 सामना खेळला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान पाकिस्तान टीमचे फलंदाजी कोच मॅथ्यू हेडन पुन्हा ऑस्ट्रेलियात परतले आहेत. मात्र त्यांना पाकिस्तान टीमची आठवण येत असल्याचं त्यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर हेडनने पाकिस्तान झिंदाबाद असं ट्विटही केलं आहे.


हेडनने ट्विट करून लिहिलंय की, 'नमस्ते पाकिस्तान! मी ब्रिस्बेनमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये आयसोलेशन काळ पूर्ण करतोय. परंतु माझं मन हृदय ढाकातील पाकिस्तान क्रिकेट संघातील सर्व खेळाडू आणि क्रीडा कर्मचारी यांच्याकडेच आहे. माझ्या शुभेच्छा पाकिस्तान क्रिकेट संघाला आहेत. शाब्बास मुलांनो! पाकिस्तान झिंदाबाद.



पाकिस्तानने भारताचा केला होता पराभव


वर्ल्डकपच्या इतिहासात पाकिस्ताननेही भारताला प्रथमच पराभूत केलं होतं. याआधी झालेल्या वर्ल्डकपमधील सर्व 12 सामने भारताने जिंकले होते. दुबईतच खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने सात विकेट्सच्या गमावत 151 रन्स केले होते. तर पाकिस्तान टीमने एकही विकेट न गमावता हे लक्ष्य गाठलं होतं.


दरम्यान यापूर्वी मोहम्मद रिझवानने हेडनला कुराणचा इंग्रजी अनुवाद भेट दिला होता. तेव्हापासून हेडन कुराण वाचण्यासाठी वेळ काढत असल्याचं त्याने सांगितलंय. हेडन मूळचा ख्रिश्चन आहे, पण त्याला इस्लाम समजून घ्यायचा आहे.