Sehar Shinwari: पाकिस्तानी अभिनेत्रीची झिम्बाब्वेला खुली ऑफर, `जो खेळाडू भारताचा पराभव करेल, त्याच्यासोबत मी...`
Sehar Shinwari offer to Zimbabwean guy : पाकिस्तानला स्पर्धेत कायम राहिल्याने आता पाकिस्तानी चाहत्यांची कॉलर टाईट झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच पाकिस्तानी अभिनेत्रीने झिम्बाब्वेच्या खेळाडूंना खुली ऑफर दिली आहे.
Pakistani actress Sehar Shinwari : सध्या रंगदार स्थितीत पोहोचलेल्या T20 World Cup मध्ये धमाकेदार लढती पहायला मिळत आहे. ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मध्ये पहिल्या दोन क्रमांकासाठी आता अटीतटीच्या लढती पहायला मिळत आहेत. दुसऱ्या गटातील स्थिती देखील स्थितीत रोमांचक दिसते. आज पाकिस्ताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव केल्याने आता सेमीफायनलचं (T20 World Cup Semifinals) तिकीट कोणाला मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता पाकिस्तानी अभिनेत्रीच्या एका ट्विटने मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
आजच्या सामन्यात पावसाने पाकिस्तानवर (PAK vs SA) कृपा दाखवली आणि डकवर्थ लुईस नियमामुळे पाकिस्तानचं काम सोपं झालं. अफ्रिकेला जास्त रनरेट मिळाल्याने सामना जिंकता आला नाही. त्यामुळे पाकिस्तानला आता सेमीफायनलच्या रेसमध्ये कायम राहिला आहे. पाकिस्तानला स्पर्धेत कायम राहिल्याने आता पाकिस्तानी चाहत्यांची कॉलर टाईट झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच पाकिस्तानी अभिनेत्रीने झिम्बाब्वेच्या खेळाडूंना खुली ऑफर दिली आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री (Pakistani actress Sehar Shinwari) सेहर शिनवारीने केलेलं ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्याबाबत तिने मोठं वक्तव्य केलंय. जर आगामी सामन्यात (India vs zimbabwe) झिम्बाब्वेने भारताला हरवलं तर मी झिम्बाब्वे मुलासोबत लग्न करेल, असं सेहर शिनवारी म्हणाली. आणि जर भारत जिंकला तर मी ट्विटर डिलीट करेल, असंही ती म्हणाली (Sehar Shinwari Tweet) आहे. अभिनेत्री सेहर शिनवारी ही अनेकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. त्यामुळे नेटकरी देखील तिची खिल्ली उडवतात.
पाहा ट्विट-
पाकिस्तान सेमीफायनलचं स्वप्न पोहतोय पण ते एवढं सोपं काम असणार नाही. आता पाकिस्तानचे 4 पाँईंट्स आहेत. पाकिस्तानचा पुढचा सामना बांग्लादेशसोबत असणार आहे. तर बांग्लादेश देखील हा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. त्यानंतर पाकिस्तानचे 6 गुण होतील. पाकिस्तानचा नेट रनरेट जास्त असल्याने पाकिस्तानसाठी हा पॉझिटिव्ह पाँईट असणार आहे. पाकिस्तान हा सामना जिंकला आणि साऊथ अफ्रिका नेदरलँड विरुद्ध हारली तर भारत आणि पाकिस्तान ग्रुप 2 मधून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.