T20 world cup points table: पाकिस्तानला पाऊस पावला...भारत आणि पाकिस्तान सेमीफायनल खेळणार? वाचा आकड्यांचं गणित

T20 world cup points table : पाकिस्तानच्या आजच्या विजयामुळे क्रिडाविश्वातील तज्ज्ञ डोक्यावर हात ठेऊन बसल्याचं दिसत आहे.  पाकिस्तानच्या विजयानंतर आता ग्रुप 2 मधील सर्वच संघाचं टेन्शन वाढलंय. वाचा कसं असेल समीकरण...

Updated: Nov 3, 2022, 06:51 PM IST
T20 world cup points table: पाकिस्तानला पाऊस पावला...भारत आणि पाकिस्तान सेमीफायनल खेळणार? वाचा आकड्यांचं गणित title=
India and Pakistan will play Semifinals

T20 WC 2022 Semifinals: सध्या सुरू असलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड (T20 world cup) कपमध्ये जोरदार लढती पहायला मिळत आहेत. कधी नव्हे ती, आक्रमक फलंदाजी, धारदार गोलंदाजी सर्वच संघाकडून पहायला मिळत आहे. प्रत्येक संघ जिंकण्यासाठी धडपडत असल्यानं आता पॉईट टेबल (T20 world cup points table) आता आणखी रंगदार झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पाकिस्तानच्या आजच्या विजयामुळे क्रिडाविश्वातील तज्ज्ञ डोक्यावर हात ठेऊन बसल्याचं दिसत आहे.

आजच्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा या स्पर्धेतील (Pakistan beat South Africa) हा पहिला पराभव होता. आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात पाकिस्तानचा 33 रन्सने दणदणीत विजय मिळवला आहे. पाकिस्तानच्या विजयानंतर आता ग्रुप 2 मधील सर्वच संघाचं टेन्शन वाढलंय.

Points Table मधील सध्याची स्थिती काय?

ग्रुप 2 मधील सर्वच संघाचे 4 सामने झाले आहेत. तीन सामन्यातील विजयासह टीम इंडिया (India) 6 गुणांसह सध्या अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर दुसऱ्या स्थानी साऊथ अफ्रिका  (South Africa)) 5 गुणांसह पाय रोऊन उभी आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर असलेला पाकिस्तान (Pakistan) 4 गुणांसह पहिल्या दोन स्थानावर डोळे ठेवून आहे. त्याबरोबर बांग्लादेशचा (Bangladesh) संघ देखील चौथ्या स्थानावर 4 अंकासह नागिन डान्स करतोय. 

भारत - पाकिस्तान सेमीफायनलमध्ये खेळणार?

भारताचा पुढील सामना झिम्बॉब्वे विरुद्ध असणार आहे. झिम्बॉब्वेने पाकिस्तानला लोळवल्याने भारताला सावधगिरी बाळगून पुर्ण तयारी करावी लागणार आहे. हा सामना जिंकला तर भारत सेमीफायनलमध्ये (T20 WC 2022 Semifinals) प्रवेश करेल. मात्र, या सामन्यात पराभव देखील झाला तरी दुसरं स्थान टीम इंडियासाठी सुरक्षित राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर रनरेटच्या हिशोबाने निकाल लागेल.

आणखी वाचा- Virat Kohli: किंग कोहलीने खरंच बेईमानी केली? क्रिकेटचा नियम काय सांगतो? वाचा सविस्तर...

दरम्यान, पाकिस्तानला आज पाऊस पावला... साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या (PAKvsSA) सामन्या पावसाने एन्ट्री मारली आणि पाकिस्तानचं समीकरण सोपं झालं. त्यानंतर वेट आऊटफिल्डचा फायदा पाकिस्तानला झाला. आता पाकिस्तानचे 4 पाँईंट्स आहेत. पाकिस्तानचा पुढचा सामना बांग्लादेशसोबत असणार आहे. तर बांग्लादेश देखील हा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे पाकिस्तान बांग्लादेश सामना शानदार होणार, अशी पुर्ण शक्यता आहे. पाकिस्तान हा सामना जिंकला आणि साऊथ अफ्रिका नेदरलँड विरुद्ध हारली तर भारत आणि पाकिस्तान ग्रुप 2 मधून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.