मुंबई : ICC T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानच्या चांगल्या खेळाचे कौतुक झाले, तर भारताच्या खराब खेळावर टीका ही झाली. त्यानंतर पाकिस्तानचा संघ (Pakistan Team) सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून (Australia Team) पराभूत होऊन बाहेर झाला. पण पाकिस्तानच्या चाहत्यांना (Cricket Fans) हा पराभव पचवता आलेला नाही. मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये कॅच सोडणाऱ्या हसन अलीवर (Hasan Ali) जोरदार टीका केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. या सामन्यात हसन अलीने 18 व्या ओव्हरमध्ये मॅथ्यू वेडचा (Matthew Wade) कॅच सोडला. यानंतर या फलंदाजाने पुढील सलग तीन चेंडूंवर सिक्स ठोकत संघाला फायनलमध्ये नेले. हा कॅच सूटल्याने सामन्याचा निकाल बदलला. त्यामुळे चाहते हसनला दोष देत आहेत.


या सामन्यात पाकिस्तानच्या पराभवानंतर हसन अलीला सतत धमक्या मिळत आहेत. त्याची भारतीय वंशाची पत्नी (Hasa Ali's Wife) सामिया आरजू हिने पुढे येऊन आपली व्यथा मांडली आहे.


सामियाने याप्रकरणी एक नाही तर अनेक ट्विट केले आहेत. मात्र, ट्रोल थांबत नसल्याने त्यांनी आपले अकाऊंट बंद केले. तिने लिहिले, "मी क्रिकेट चाहत्यांची निराशा चांगल्या प्रकारे समजू शकते, परंतु हा सर्व खेळाचा भाग आहे." पाकिस्तानचे बहुतेक चाहते मला भारतीय गुप्तहेर समजतात हे जाणून मला वाईट वाटले. हसनची पत्नी असल्याने मी सर्व पाकिस्तानी चाहत्यांची माफी मागते आणि या पराभवाबद्दल दु:खी आहे, परंतु सामन्यानंतर आम्हाला दुबई आणि पाकिस्तानमधील आमच्या घरी धमक्या येत आहेत.'