इस्लामाबाद : संपूर्ण अफगाणिस्तानात आता तालिबान्यांचं राज्य आहे. तालिबानी लवकरच अफगाणिस्तानात सत्ता स्थापन करणार आहेत. या तालिबान्यांनी दहशतीच्या जोरावर अनेक अफगाणि नागरिकांचा जीव घेतला. अनेक कुटुंब उद्धवस्त झाली. तालिबान्यांनी अमानूषपणे अत्याचार केले. या सर्व प्रकारामुळे जगभरातून तालिबान्यांचा निषेध केला जात आहे. त्यात आता पाकिस्तानचा माजी कर्णधार (Pakistan Cricket Team)  शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi)  तालिबान्यांचं कौतुक केलंय. ज्यामुळे त्याच्या विरुद्ध संताप व्यक्त केला जातोय. तसाच यामुळे नेटीझन्सनेही त्याला चांगलाच फैलावर घेतलाय. (pakistani former cricketer Shahid Afridi says Taliban have come with very positive mind)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिदीने तालिबान्यांचं कौतुक केलंय. तालिबान्यांच्या राज्यात अफगाणिस्तानातील महिलांना मर्जीनुसार काम करण्याचं स्वतंत्र असेल. तालिबान्यांनी महिलांना स्वातंत्र्य दिलंय. तसेच त्याचा क्रिकेटलाही फायदा होईल, असा दावा आफ्रिदीने केलाय. 


आफ्रिदी काय म्हणाला?  


"तालिबानी फार सकारात्मक आहेत. हे असं याआधी कधीच नजरेस पडलं नाही. आता अनेक गोष्टी या सकारात्मक होतायेत. महिलांना काम करण्यासह, राजकारण तसेच अन्य बाबतीतही परवानगी मिळाली आहे. तालिबान्यांचा क्रिकेटलाही पाठिंबा आहे. तालिबान्यांना क्रिकेट फार आवडतं", असं म्हणत आफ्रिदीने तालिबान्याचं कौतुक केलंय. 


नेटीझन्स संतापले 


दरम्यान आफ्रिदीन तालिबान्यांचं कौतुक केल्याने नेटीझन्स चांगलेच संतापले आहेत. त्यांनी आफ्रिदीवर टीका केली आहे. त्याला ट्रोल केलं जात आहे. यामुळे आफ्रिदी ट्विटरवर ट्रेंड करतोय. आफ्रिदीला तालिबान्यांचा पंतप्रधान करावं, असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलंय.