मुंबई: विराट कोहली आपल्या फलंदाजीसाठी जगभर प्रसिद्ध आहेच पण त्याच बरोबर आपल्या हटके आणि हॅण्डसम लूकमुळे तरुणींमध्ये देखील प्रसिद्ध आहे. कोहलीच्या स्टाइलवर आणि फलंदाजीवर भारतातील नाही तर जगभरातील तरुणी फिदा आहेत असं म्हणायला हरकत नाही. अनेकदा या खेळाडूंचे फॅन्स अशा गोष्टी करतात ज्यामुळे खेळाडू पेचात देखील काहीवेळा सापडतो. अशीच एक चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमध्ये देखील कोहलीचे तुफान चाहते आहेत. त्यापैकीच एका तरुणनं चक्क विराट कोहलीला द्या अशी मागणी केली आहे. पाकिस्तानी गर्ल रिजला रेहाना असं या तरुणीचं नाव आहे. ही सौंदर्यवती विराट कोहलीची जबरदस्त फॅन आहे. ती कोहलीसाठी खूप वेडी आहे असंही म्हणायला हरकत नाही. 


2019च्या वर्ल्ड कपदरम्यान रिजला चर्चेत आली होती. ती पाकिस्तानची आहे. 2019च्या वर्ल्ड कपवेळी एका मुलाखती दरम्यान अशी कोणती गोष्ट आहे जी टीम इंडियाकडून गिफ्ट म्हणून देऊ इच्छीता? त्यावर रिजला रेहानानं मला फक्त विराट कोहली द्या असं सांगितलं. 


सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. ती सोशल मीडियावर चाहत्यांसाठी फोटो देखील शेअर करत असते. रिजला क्रिकेटशी निगडीत अनेक फोटो पोस्ट करत असते. त्यावरून तिला किती क्रिकेट आवडतं याचा अंदाज आपण लावू शकतो. 


रिजला रेहान पहिल्यांदा 2018मध्ये एशिया कप दरम्यान चर्चेत आली होती. 2019 दरम्यान भारत पाकिस्तान झालेल्या मॅनचेस्टर सामन्यादरम्यान देखील ही तरुणी उपस्थित होती. रिजला रेहान पाकिस्तानच्या कराची इथली रहिवासी आहे. मात्र गेल्या 12 वर्षांपासून ती दुबईमध्ये राहात आहे. 2019च्या वर्ल्ड कर सेमीफायनल दरम्यान तिने टीम इंडियाला चिअर्स केलं होतं.