नवी दिल्ली : मंगळवारी हेगले ओव्हल मैदानात झालेल्या अंडर १९ विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. भारताचा २०३ धावांनी विजय झाला आणि भारताने आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले. यात शुभमन गिलचे शतक, सामनावीर पृथ्वी शॉ यांच्या दमदार खेळीमुळे या विजयाला आपण गवसणी घातली. ५० ओव्हरमध्ये ९ विकेट घालून २७२ रन्स केले. मात्र हे लक्ष्य पाकिस्तानी टीम गाठू शकली नाही. २९.३ ओव्हर्समध्ये ६९ रन्सवर पाकिस्तानी टीमचा खेळ खल्लास झाला. ईशान पोरेल याने सर्वाधिक म्हणजे ४ विकेट्स घेतल्या.


सामन्याची सुरूवात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६९ रन्स हा टूर्नामेंटमधील सर्वात कमी स्कोर होता. पाकिस्तानचे फक्त ३ खेळाडू १० चा आकडा पार करू शकले. त्यापैकी रोहेल नजीर याने सर्वाधिक म्हणजे १८ रन्स केले. साद खानने १५ तर मुहम्मद मूसाने ११ रन्सचे योगदान दिले.
फलंदाजीला सुरूवात करत कर्णधार पृथ्वी शॉ ने ४१ तर मनजोत कालरा ४७ अशी उत्तम सुरूवात केली. ८९ धावांची उत्तम साथ दिल्यानंतर कर्णधार पृथ्वी शॉ रन आऊट झाला. 


दणदणीत पराभव


२०३ धावांनी पराभूत झालेल्या पाकिस्तानी टीमची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली. लोकांनी पाकिस्तानी टीमला खूप ट्रोल केले. या सामन्यात पाकिस्तानचा कोणताही खेळाडू १८ हुन अधिक रन्स करू शकला नाही. त्यामुळे मर्यादा धावांची नसून वयाची होती, असे म्हणून त्यांना ट्रोल करण्यात आले.