मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वांत सुंदर महिलांपैकी एक असलेल्या कायनात इम्तियाज या महिला क्रिकेटरने नुकतचं फोटो शूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती लग्नाच्या आऊटफिटमध्ये क्रिकेटच्या मैदानावर बॅटींग करताना दिसतेय. तिच्या या फोटोशूटची एकच चर्चा सूरू आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांची विकेट पडलीय.     


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


29 वर्षीय पाकिस्तानी महिला क्रिकेटर कायनात इम्तियाज तिच्या सौंदर्यामुळे खूप चर्चेत असते. ती सोशल मिडियावर नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.



कायनात इम्तियाजने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. हे तिच्या प्री-वेडिंगचे फोटोशूटमधले फोटो आहेत. या फोटोत ती लग्नाच्या लाल जोड्यात सूंदर दिसतेय.  



कायनात इम्तियाजने मोहम्मद वकार उद्दीनसोबत लग्न केलय. ३० मार्च रोजीचं त्याच हे लग्न झाले आहे. यानंतर आता तिने फोटो शेअर केले आहेत.   



कायनात इम्तियाजने पाकिस्तानसाठी 15 एकदिवसीय सामने खेळलेत आणि 6.15 च्या इकॉनॉमी रेटच्या मदतीने 9 बळी घेतलेत. एकदिवसीय सामन्यात १२४ धावा केल्या आहेत. कैनत इम्तियाजने 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 9 विकेट घेतल्या आहेत आणि 120 धावा केल्या आहेत.