पाकिस्तानच्या बाबर आझमनं मोडलं विराटचं रेकॉर्ड
पाकिस्तानचा बॅट्समन बाबर आझमनं भारताचा कर्णधार विराट कोहलीचं रेकॉर्ड मोडलं आहे.
मुंबई : पाकिस्तानचा बॅट्समन बाबर आझमनं भारताचा कर्णधार विराट कोहलीचं रेकॉर्ड मोडलं आहे. बाबर आझमनं आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सगळ्यात जलद १ हजार रन पूर्ण केल्या आहेत. १ हजार रन पूर्ण करायला बाबर आझमला फक्त २६ इनिंग लागल्या. याआधी हे रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर होतं. विराट कोहलीनं २७ इनिंगमध्ये १ हजार रन पूर्ण केल्या होत्या. तर अॅरोन फिंचनं २९ इनिंगमध्ये आणि फॅप डुप्लेसिस, अॅलेक्स हेल्स आणि केव्हिन पीटरसननं ३२ इनिंगमध्ये १ हजार रन पूर्ण केले.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये बाबर आझमनं ५८ बॉलमध्ये ७९ रनची खेळी केली. या खेळीदरम्यान बाबर आझमनं विराटचं रेकॉर्ड मोडलं. बाबर आझमनं २६ टी-२० मॅचच्या २६ इनिंगमध्ये ५४.२६ ची सरासरी आणि १२४.३७ च्या स्ट्राईक रेटनं १०३१ रन केले आहेत. टी-२० मध्ये बाबर आझमच्या नावावर ८ अर्धशतकं आहेत. त्याचा सर्वाधिक स्कोअर ९७ रन आहे.