ढाका | टी 20 वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेट टीम बांगलादेश दौऱ्यावर (Pakistan tour of Bangladesh 2021) आहे. टी 20 आणि कसोटी अशा दोन मालिकांचं नियोजन या दौऱ्यात आहे. या पैकी 3 सामन्यांची मालिका पाकिस्तानने 3-0 ने जिंकली आहे. आता 26 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेआधी शोएब मलिक (Shoaib Malik) दौरा अर्धवट सोडून माघारी परतला आहे. शोएबने  पत्नी सानिया मिर्झाच्या (Sania Mirza) एका पोस्टनंतर माघारी परतण्याचा निर्णय घेतला आहे. (paksitan senior cricketer and husband of sania mirza shoaib malik has missed to bangladesh t20 due to son izhaan health issue)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की कारण काय? 


शोएबने मुलगा ईझहानची (Izhaan Mirza Malik) तब्येत बिघडल्याने शोएबने बांगलादेश दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. सानियाने रविवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. सानियाने या पोस्टमध्ये मुलाच्या आजाराबाबात सांगितलं होतं.


सानियाची इंस्टाग्राम पोस्ट


शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झाने रविवारी संध्याकाळी एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने आपल्या मुलाच्या आजाराबद्दल सांगितले होते. सानियाने या पोस्टमध्ये लिहिले की, “जेव्हा तुमचा मुलगा आजारी असतो आणि फक्त दोन तासांच्या झोपेनंतर तुम्ही काम करत असता.” 


दरम्यान या टी 20 मालिकेनंतर पाकिस्तान बांगलादेश विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 26 ते 30 नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा सामना हा 4 ते 8 डिसेंबरला पार पडणार आहे.