`सार्वजनिक जीवनात...` पलाश मुच्छालने भारतीय स्टार खेळाडू स्मृती मानधनासोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच केलं व्यक्तव्य
Smriti Mandhana and Palash Muchhal: पलाश मुच्छालने स्मृती मानधनासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल खुलासा केला, त्याने ते खाजगी का ठेवले याबद्दलही स्पष्ट केले आहे.
Smriti Mandhana Boyfriend: भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना संगीतकार-चित्रपट निर्माता पलाश मुच्छालला डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहेत.
पलाश आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघाची कर्णधार स्मृती मानधना यांचा WPL दरम्यानचा एक फोटो गेल्या वर्षी प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर या कपलने त्यांची पाचवी अनिव्हर्सरी साजरी करतणाचा फोटो टाकून त्यांचे नाते अधिकृतरित्या जाहीर केले होते.
सार्वजनिकरित्या एकमेकांबद्दल कधीही बोलले नाही
या जोडप्याने कोणतेही सार्वजनिक विधान करणे आजवर टाळले आहे. दोघेही सार्वजनिकरित्या एकमेकांबद्दल कधीही बोलले नाही. परंतु अलीकडेच पलाश मुच्छाळ पहिल्यांदाच उघडपणे बोलला आहे. इतके दिवस हे नाते गुप्त ठेवण्यामागचे कारणही त्याने सांगितले आहे. "सार्वजनिक जीवनात मी फार लाजरा आणि इंट्रोव्हर्ट आहे. लोकांचा यावर विश्वास बसत नाही कारण मला फार मित्र आहेत आणि मी कायम स्टेजवर दिसतो. मात्र मी जेव्हा इव्हेंट किंवा पार्टीदरम्यान फोटोसाठी पोज देतो तेव्हा मला फार अवघडल्यासारखं होत असतं."
हे ही वाचा: IND vs AUS: क्रिकेट विश्वात शोककळा...भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान 'या' महान फलंदाजाचे निधन
स्मृतींचे केले कौतुक
यावेळी स्मृतींचे कौतुक करण्यासही पालाशने मागेपुढे पहिले नाही: "मला खूप अभिमान वाटतो, साहजिकच, कारण मी तिचा बॉयफ्रेंड आहे; आत्तापर्यंतच्या तिच्या कामगिरीचा मला खूप अभिमान आहे. पण मला माझे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायला आवडते. हीच वेळ आहे जेव्हा मी शक्य तितके काम केले पाहिजे."
हे ही वाचा: शुभमन गिल आणि अभिषेक नायर यांच्यात जोरदार टक्कर, 4200 रुपये पणाला; कोण जिंकले? बघा मजेशीर Video
हे ही वाचा: बीसीसीआयपुढे पीसीबी झुकलं, हायब्रीड मॉडेलला पाकिस्तान मान्य; पण ठेवल्या 'या' २ अटी!
यावर्षी तुमचे वैयक्तिक आयुष्य लोकांच्या आवडीचा विषय बनले आहे याबद्दल तुम्हाला कसे वाटते? असे विचारल्यावर तो म्हणाला की “माझ्यासाठी ही खूप अस्वस्थ करणारी परिस्थिती होती कारण डब्ल्यूपीएल दरम्यान, जेव्हा मी तिला मैदानावर भेटत होतो तेव्हा आम्हाला कॅमेरा टिपत आहे हे मला माहीत नव्हते. मला ते कळले नाही. मला समजले असते तर मी मैदानात नसतो. पण आता तो क्षण सगळीकडे आहे. माझ्या शोमध्येही लोक आरसीबी, आरसीबी ओरडत राहतात. ”