वर्ल्डकपमध्ये ऋषभ पंतने करावी रोहित शर्मासोबत ओपनिंग- वॉर्न
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचा भारतीय टीमला सल्ला
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्नने भारतीय टीमला सल्ला दिला आहे की, आगामी वर्ल्डकपमध्ये भारताने ओपनिंग जोडीमध्ये बदल करावा. वॉर्नने म्हटलं की, शिखर धवनच्या ऐवजी भारताने वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा सोबत ऋषभ पंतला ओपनिंगला पाठवले पाहिजे. सध्या धवन आणि रोहित शर्मा भारतासाठी ओपनिंग करतात. दोघांनी 96 वनडे इनिंगमध्ये 45.45 च्या रनरेटने 4318 रन केले आहेत. ज्यामध्ये १४ शतकांचा समावेश आहे. सर्वाधिक ओपनिंग पार्टनरशिपमध्ये ही जोडी चौथ्या स्थानावर आहे. पण वॉर्नला वाटतं की, भारताने वर्ल्डकप टुर्नामेंटमध्ये ओपनिंगला धवनच्या ऐवजी पंतला संधी द्यावी.
इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत, शेन वॉर्नने म्हटलं की, 'चर्चा अशी आहे की, ऋषभ पंत टीममध्ये असेल का ?. मला वाटतं धोनी आणि पंत दोघेही खेळू शकता. मला असं नाही वाटत की पंत हा एक बॅट्समन म्हणून देखील खेळू शकतो. तो शानदार आहे. तो रोहित शर्मासोबत ओपनिंग देखील करु शकतो.'
वॉर्नने पुढे म्हटलं की, 'मला माहित आहे की, शिखर धवन बॅट्समन म्हणून चांगला खेळतो. पण रोहित शर्मा सोबत ऋषभ पंतने ओपनिंग करणे भारतासाठी फायद्याचं ठरेल. जर अशा प्रकारच्या एक्स-फॅक्टर आणि रणनीतीने भारतीय टीम गेली तर विरुद्ध टीमला आश्चर्याचा धक्का बसेल.'