मुंबई : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी सध्या आपल्या होमटाऊनमध्ये साक्षी आणि झिवासोबत क्वालिटी टाइम घालवत आहे. माहीने आपल्या इंस्टाग्राम अकांऊटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. नेहमीप्रमाणे झिवा आपल्या फुग्यांसोबत खेळताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दरम्यान, साक्षी झिवाला विचारते की, 'झिवा, पापा चांगले आहेत की वाईट?' तेव्हा तात्काळ उत्तर येतं. 'तुम्ही सगळे चांगले आहात'. एवढंच काय तर झिवा या उत्तराला एकसारखं बोलत होती. या व्हिडिओत साक्षी दिसत नाही. पण धोनी त्या फुग्यांसोबत मस्ती करताना दिसत आहे. आणि मस्तीमध्ये झिवावर फुगे उडवत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर 17 लाख लोकांनी पाहिला आहे. 



इंग्लडमधून परत आल्यावर धोनी आणि साक्षी त्यांची बेस्ट फ्रेंड पूर्णा पटेल हिच्या लग्नात सहभागी झाले होते. पूर्णा पटेल ही माजी केंद्रीय मंत्री आणि एनसीपीचे नेता प्रफुल्ल पटेल यांची मुलगी आहे. तिचं लग्न नुकतच बिझनेसमन नमित सोनीसोबत झालं आहे. पूर्णाच्या लग्नाचे सगळे प्रोग्राम मुंबईत होते. धोनी आपल्या संपूर्ण कुटुंबासहीत या लग्नासाठी मुंबईतच होते.