राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरालिम्पिकपटू दीपा मलिक यांची यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दोन दिवसांच्या बैठकीनंतर १२ सदस्यीय निवड समितीने दोघांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. २०१५ साली बजरंगला अर्जुन तर २०१९ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. बजरंगच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन पदके आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपा मलिकने २०१६ च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. याव्यतिरीक्त आशियाई खेळांमध्येही दीपाच्या नावावर तीन कांस्य आणि एक रौप्य पदकाची नोंद आहे. या पुरस्कारासह द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर रवींद्र जाडेजाला यंदा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.