Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने (Indian Hockey Team) स्पेनचा पराभव करत कांस्य पदकाची (Bronze Medal) कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक पटकावत इतिहास रचला आहे. भारतातर्फे कर्णधार हरमनप्रीत सिंहने दोन गोल केले. तर गोलकिपर पीआर श्रीजेशने भक्कम बचाव करत स्पेनचं आक्रमन परतावून लावलं. या विजयानंतर भारतीय हॉकी संघाबरोबरच संपूर्ण भारतात विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक नेते आणि सेलिब्रेटिंनी भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएम मोदींचा खेळाडूंना फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह याचा सरपंच म्हणून उल्लेख केला. यावर सर्व खेळाडू खळखळून हसले. पीएम मोदी यांनी पीआर श्रीजेश याच्याशीही चर्चा केली.  यशस्वी कारकिर्दीनंतर निवृत्ती स्विकारणाऱ्या श्रीजेशला पीएम मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. पीएम मोदी यांनी संपूर्ण भारतीय संघाचं अभिनंदन करत संपर्ण संघाच्या मेहनतीचं हे फळ असल्याचं सांगितलं. पीएम मोदी यांनी श्रीजेशला एक सल्लाही दिला. हॉकीतून निवृती घेतली असलीस तरी नवा संघ तुलाच तयार करायचं आहे, असं पीएम मोदी म्हणाले.


ट्विटरवरुनही दिल्या शुभेच्छा
त्याआधी पीएम मोदी यांनी सोशल मीडिया एक्सवरुनही टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. 'ही एक अशी उपलब्धी आहे जी येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील. भारतीय हॉकी संघाने शानदार कामगिरी करत कांस्य पदक पटकावलं आहे. हे पदक यासाठीही विशेष आहे कारण ऑलिम्पिकमध्ये हे भारताचं सलग दुसरं पदक आहे. संघाचं यश, कौशल्य आणि धैर्य आणि सांघिक भावनेचा हा विजय आहे. भारतीय खेळाडूंचं अभिनंदन, प्रत्येक भारतीयाचा हॉकीशी भावनिक संबंध आहे आणि या कामगिरीमुळे हा खेळ आपल्या देशातील तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय होईल' असं पीएम मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 


भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंवर पैशांची बरसात झालीय. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भारतीय हॉकी संघातील पंजाबच्या प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. ट्विटकरत मान यांनी ही घोषणा केली असून 'चक दे इंडिया... ईनाम' असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. भारतीय हॉकी संघात कर्णधार हरमनप्रीत सिहं याच्यसह 10 खेळाडू पंजाबचे आहेत.