पॅरिस ऑलिम्पिक 2024: जगातला असा देश जिथे ऑलिम्पिक मेडल जिंकल्यावर दिल्या गाय; पुढे काय झालं? जाणून घ्या
Paris Olympics 2024: ऑलिम्पिक मेडल विजेत्याला कोणी गाय बक्षिस म्हणून देण्याचा विचारही करणार नाही. पण मग या देशाने असा विचार का केला असेल?
Paris Olympics 2024: ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठ्या स्तरावर होणारा स्पोर्ट्स इव्हेंट आहे. येथे देशविदेशातील 10 हजारहून अधिक एथलिट्स सहभागी व्हायला येतात. प्रत्येक देशातील नागरिकांना आपल्या खेळाडुंकडून 3 पैकी एक तरी मेडल जिंकण्याची अपेक्षा असते. दरम्यान मेडल जिंकलेल्यांचे देशभरात कौतुक होतं.भारताकडून ऑलिम्पिक जिंकणाऱ्यांना मोठी रक्कम दिली जाते. पॅरिस ऑलम्पिकमध्ये मेडल जिंकलेल्या टीम इंडियाच्या 4 खेळाडूंना राज्य सरकारडून 1 कोटीचं बक्षिस जाहीर करण्यात आलंय. या खेळाडुंना सरकारी नोकरीदेखील देण्यात येते. पण असा एक देश आहे, जिथे मेडल जिंकलेल्या आपल्या खेळाडुला बक्षिस म्हणून 5 गाय देण्यात आल्या. भारतात गाय पवित्र मानले जाते. असे असले तरी ऑलिम्पिक मेडल विजेत्याला कोणी गाय बक्षिस म्हणून देण्याचा विचारही करणार नाही. पण मग या देशाने असा विचार का केला असेल? पुढे काय झालं? सविस्तर जाणून घेऊया.
सुवर्ण पदक जिंकणारी देशातील एकमेव खेळाडू
इंडोनेशिया देशाने आपल्या ऑलिम्पिक मेडल विजेत्या खेळाडुंना गाय दिल्या. 2020 टोक्यो ऑलिम्पिक्सच्या महिला डबल्स स्पर्धेत इंडोनेशियाची खेळाडू एप्रियानी रहायू हिला सुवर्ण पदक मिळाले होते. यानंतर तिचे जगभरातून कौतुक झाले. अशी कामगिरी करुन एप्रियानीने इतिहास घडवला होता. साहजिकच तिला खूप मोठी रक्कम मिळेल अशी आशा होती. कारण इंडोनेशियाकडून सुवर्ण पदक जिंकणारी ती एकमेव खेळाडू होती. इंडोनेशिया सरकारने तिला आपल्या देशातील करन्सीचे 5 अरब रुपये बक्षिस म्हणून दिले. पण आणखी एक वेगळ बक्षिस रहायूची वाट पाहत होतं. एप्रियानी रहायू ही सुलावेसी आयलॅंड येथे राहते. हा इंडोनेशियाचा एक भाग आहे. सुलावेसीच्या नेत्यांनी रहायूला 5 गाय आणि एक घर बक्षिस रुपात देण्याचा शब्द दिला.यासोबतच तिला एक रेस्तरॉंदेखील देण्यात आले.
ग्रॅज्युएटही न झालेल्या मनू भाकरची किती आहे संपत्ती? सर्वकाही जाणून घ्या
इंडोनेशियाचा बॅडमिंट खेळासाठी जगभरात दबदबा
इतर देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसे दिली जातात.पण एकावेळी इतक्या संपत्तीचा पाऊस पाडणं एका खेळाडुसाठी एक स्वप्न असतं. इंडोनेशियाचा बॅडमिंट खेळासाठी जगभरात दबदबा आहे. याआधी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणारा खेळाडुही बॅडमिंटनपट्टू होता. रुडी हारटोनोने 1972 ऑलिम्पिकच्या सिंगल्स बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. बॅडमिंटनमध्ये आजपर्यंच इंडोनेशियाने 8 सुवर्ण सहित 21 ऑलिम्पिक मेडल जिंकले आहेत.