Lakshya Sen vs Lee Zii Jia Bronze Medal Match : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाच्या लढतीत भारताच्या लक्ष्य सेनचा सामना मलेशियाच्या ली झियाशी झाला होता. या सामन्यात ली झियाने कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. लक्ष्य सेनचा महत्त्वाच्या सामन्यात पराभव झाला. या सामन्यात पहिला सेट लक्ष्यने 21-13 असा जिंकला होता. याशिवाय दुसऱ्या सेटमध्ये त्याला 16-21 असा पराभव स्विकारावा लागला. अखेरचा सेटमध्ये सामन्याचा निकाल लागणार होता. मात्र, लक्ष्यला तिसऱ्या सेटमध्ये ली झियाच्या अटॅकचा सामना करता आला नाही. तिसरा सेट लक्ष्यने 21-11 ने गमावला आणि इतिहास रचण्याचा मान थोडक्यात हुकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात लक्ष्य सेन दुखापतग्रस्त असताना देखील मैदानात उतरला होता. लक्ष्य सेनच्या उजव्या कोपऱ्याला दुखापत झाली होती. तो मैदानात पट्टी लावून आला होता. मात्र, सामन्यावेळी ती पट्टी रक्ताळलेली दिसली. त्यानंतर सामना थांबवून त्याला पुन्हा पट्टी करण्यात आली. उजव्या हातालाच दुखापत झाल्याने लक्ष्यला पुरेपुर ताकद लावता आली नाही. मात्र, लक्ष्यने दुखापतीकडे जास्त लक्ष न देता आपला गेम सुरू ठेवला होता. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



लक्ष्य सेनचे पदक हुकले तर त्याची ही ऐतिहासिक कामगिरी ठरली. ऑलिम्पिकच्या इतिहासात उपांत्य फेरीत पोहोचलेला तो भारताचा पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरला आहे. पहिला सेट जिंकल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये लक्ष्यची एनर्जी कमी पडल्याचं दिसून आलं.


कुटुंबाकडून प्रेरणा


लक्ष्य सेनचा जन्म 16 जुलै 2001 रोजी झाला आणि त्याचे आजोबा आणि वडील देखील बॅडमिंटन खेळले. लक्ष्य सेनचे आजोबा सीएल सेन राष्ट्रीय स्तरावर खेळले तर वडील डीके सेन प्रशिक्षक होते. लक्ष्यचा भाऊ चिराग सेन देखील बॅडमिंटन खेळतो. मला माझ्या कुटूंबाकडून खेळण्याची प्रेरणा मिळते, असं लक्ष्य सेनने म्हटलं होतं.


लक्ष्य सेनची एकूण संपत्ती किती?


लक्ष्य सेनची प्रमुख कमाई बॅडमिंटनमधून येते आणि यासोबतच तो अनेक ब्रँड्सच्या जाहिराती देखील करतो ज्यातून त्याचा चांगले पैसे मिळतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तो चांगली कमाई करतो. मीडिया रिपोर्टनुसार लक्ष्य सेनची एकूण संपत्ती 41 कोटी रुपये इतकी आहे.