Paris Olympics मध्येही पुन्हा तीच चूक! खेळाडूंना मिळाला `अँटी S** बेड`, व्हिडीओ व्हायरल
Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिक्सच्या खेळाडूंना देण्यात आलेल्या बेडवरून पुन्हा वाद समोर आला आहे. पॅरिसमधील बेड देखील ऍन्टी सेक्स बेड (Antisex bed) असल्याचं बोललं जात आहे.
Paris Olympics Players got Antisex bed : जागतिक खेळाचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला (Paris Olympics) आता सुरुवात होत आहे. देश-विदेशातील खेळाडू पॅरिसमध्ये पोहोचले आहेत. 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान पॅरिस येथे स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. दरवेळी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत होती. अशातच आता स्पर्धा सुरू होण्याआधीच ऑलिम्पिक्स चर्चेत आली आहे. 2021 मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये चर्चेत असलेला ऍन्टी सेक्स बेड (Antisex bed) देखील पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमका विषय काय?
ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंमधील लैंगिक संबंधांना प्रतिबंध करण्याच्या प्रयत्नात आयोजकांनी पुठ्ठ्यापासून बनवलेले बेड सादर केले होते. त्याला 'ऍन्टी सेक्स बेड' म्हणून ओळखलं जातं. टोकियो ऑलिम्पिक्समधील हाच ऍन्टी सेक्स बेड आता पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये देखील वापरण्यात येणार आहे. 2021 मध्ये अमेरिकन ट्रॅक आणि फील्ड धावपटू पॉल चेलिमो याने यावर पोस्ट केल्यानंतर हा विषय चर्चेत आला होता. बेड केवळ एका व्यक्तीचे वजन उचलू शकेल, असं त्याने लिहिलं होतं. त्यानंतरच या बेडला 'ऍन्टी सेक्स बेड' म्हणून ओळखलं गेलं.
अशातच आता ऑस्ट्रेलियन टेनिस स्टार डारिया सॅव्हिल आणि एलेन पेरेझ यांनी स्वत: नवीन अँटी-सेक्स बेडची चाचणी केली आणि सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये, डारिया सॅव्हिल आणि एलेन पेरेझ व्हॉली व्यायाम, स्क्वॅट जंप, स्टेप-अप इत्यादी करताना दिसत आहेत. कार्डबोर्डच्या बेडची चाचणी करतानाचा व्हिडीओ खेळाडूंनी शेअर केल्यानंतर बेड उत्तीर्ण झाल्याचं दिसतंय. मात्र, बेड आरामदायक नाहीत, अशी टीका देखील खेळाडूंनी केली आहे.
आयरिश जिम्नॅस्ट रायस मॅकक्लेनघन याने देखील बेडची चाचणी तेली अन् बेड 'ऍन्टी सेक्स बेड' असल्याचा दावा खोडून काढला आहे. इन्स्टाग्रामवर तिचा व्हिडिओ शेअर करत, पॅरिस ऑलिम्पिक ऍन्टी सेक्स बेडचा पुन्हा पर्दाफाश झालाय, असं त्याने कॅप्शनमध्ये देखील लिहिलंय.
दरम्यान, 45 खेळांमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतानं पॅरिस ऑलिम्पिकसाठी 117 खेळाडू तयार केले आहेत. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत भारतीय खेळाडू डझनभर पदकं घेऊन येतील, असा विश्वास आहे. ऑलिम्पिकसाठी 90 लाख तिकीटं विकली गेली आहे. यामध्ये 206 देशांचे 10,500 खेळाडू सामील होतील.