पॅरालिम्पिकमध्ये भारताची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, आतापर्यंत किती गोल्ड आणि सिल्व्हर मिळवले? पाहा यादी
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताचे खेळाडू पदकांची लयलूट करत आहेत. बुधवारी दिवसाअंती भारताच्या खात्यात एकूण 24 पदकांचा समावेश झाला.
Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताचे खेळाडू पदकांची लयलूट करत आहेत. बुधवारी दिवसाअंती भारताच्या खात्यात एकूण 24 पदकांचा समावेश झाला असून यात 5 सुवर्ण, 9 रौप्य तर 10 कांस्य पदकांचा समावेश झाला आहे. बुधवारी शॉर्ट पुटमध्ये सचिन खिलारी यांनी रौप्य पदक जिंकले तर तिरंदाजीत हरविंदर सिंह यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर धरमबीर आणि प्रणव सोरमा या दोघांनी पुरुषांच्या क्लब थ्रो F51 फाइनलमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले. भारताने पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत सर्वाधिक पदक जिंकण्याचा रेकॉर्ड मोडला आहे. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने 19 पदक जिंकली होती.
भारतीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया यांनी भारत यंदा किमान 25 पदक जिंकून आणेल असे लक्ष्य ठेवले होते. आता हे लक्ष पूर्ण करण्यासाठी भारत केवळ 1 पदक दूर असून भारतीय खेळाडू गुरुवारीच हे लक्ष पूर्ण करू शकतात. गुरुवारी मिक्स्ड 50 मीटर राइफल प्रोन SH1 मध्ये सिद्धार्थ बसु आणि मोना अग्रवाल एक्शनमध्ये असतील. मिक्स्ड टीम रिकर्व ओपन प्री क्वार्टरफाइनलमध्ये पूजा आणि हरविंदर सिंह पदक जिंकण्याचा प्रयत्न करेल. एथलेटिक्समध्ये सुद्धा आज भारताला पदक जिंकण्याची संधी आहे. यात भारतीय खेळाडू अरविंद हे पुरुषांच्या शॉटपुट एफ35 स्पर्धेत सहभागी होत आहेत.
हेही वाचा : मृत्यूशी लढतोय 'हा' स्टार क्रिकेटर, ICU मध्ये दाखल; गुरुग्राममध्ये सुरु आहेत उपचार
5 सप्टेंबर 2024 भारताचं पॅरालिम्पिकमधील संपूर्ण शेड्युल :
शूटिंग : सिद्धार्थ बसु आणि मोना अग्रवाल - मिश्रित 50 मीटर राइफल प्रोन SH1 क्वालिफिकेशन- दुपारी 1 वाजता
जूडो : कोकिला - महिला 31 क्वार्टर फाइनल महिला 48 किलोग्राम - दुपारी 1:30 वाजता
जूडो : कपिल परमार - पुरुष 60 किलोग्राम 11 क्वार्टर फाइनल- दुपारी 1:30 वाजता
आर्चरी : पूजा, हरविंदर सिंह - मिक्स्ड टीम रिकर्व ओपन 1/8 एलिमिनेशन - दुपारी वाजता
एथलेटिक्स : सिमरन शर्मा - 100 मीटर महिला T20 सेमीफाइनल - दुपारी 3:10 वाजता
पावरलिफ्टिंग : अशोक - पुरुष अप टू 65 किलोग्राम - दुपारी 10.05 वाजता
भारताकडून यंदा पॅरालिम्पिकमध्ये 84 खेळाडूंचा सहभाग :
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 साठी भारताने यंदा 84 खेळाडूंचा समूह पाठवला आहे. हे खेळाडू विविध 12 स्पर्धांमध्ये भाग घेणार असून यात 52 पुरुष तर 32 महिला खेळाडूंचा समावेश आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेची सांगता 9 सप्टेंबरला होईल.