सचिन .. सचिन..! महाराष्ट्राच्या सुपुत्रानं पॅरालिम्पिकमध्ये रचला इतिहास, 40 वर्षांनी पहिल्यांदा जिंकलं पदक
सातव्या दिवशी भारताचे हे पहिले पदक असून तब्बल 40 वर्षांमध्ये पॅरालिम्पिक शॉट पुटमध्ये मेडल जिंकणारा सचिन हा पहिला पुरुष खेळाडू बनला आहे.
Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या सातव्या दिवशी भारताची दमदार सुरुवात झाली असून महाराष्ट्राचा सुपुत्र सचिन खिलारी याने पुरुषांच्या शॉट पुट एफ 46 कॅटेगरीमध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. सातव्या दिवशी भारताचे हे पहिले पदक असून तब्बल 40 वर्षांमध्ये पॅरालिम्पिक शॉट पुटमध्ये मेडल जिंकणारा सचिन हा पहिला पुरुष खेळाडू बनला आहे. यापूर्वी 1984 मध्ये भारताने पॅरालिम्पिक स्पर्धेत शॉटपुटमध्ये पहिलं पदक जिंकलं होतं. सचिनच्या या मेडलनंतर भारताच्या खात्यातील एकूण पदकांची संख्या ही 21 वर पोहोचली आहे.
आशियातील रेकॉर्ड मोडत जिंकलं पदक :
34 वर्षीय सुनील खिलारी दुसऱ्या प्रयत्नात आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले आणि 16.30 मीटर चा आपला आशियातील रेकॉर्ड मोडला. त्याने हा रेकॉर्ड मे 2024 मध्ये जपानमध्ये झालेल्या वर्ल्ड पॅरा एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये केला होता. यात त्याने सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. खिलारी याचं रौप्य पदक हे सध्या पॅरा गेम्समध्ये पॅरा एथलेटिक्समधील 11 वं पदक होतं.
चीनमध्ये झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. F46 कॅटेगरी ही त्या खेळाडूंसाठी आहे ज्यांचा हात कमजोर आहे किंवा काही कमजोरी असल्याने त्यांचा हात व्यवस्थित काम करत नाही. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सचिनने रौप्य पदक जिंकले तर कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने सुवर्ण पदक आपल्या नावे केले. तसेच क्रोएशियाच्या लुका बाकोविचने कांस्य पदकाची कमाई केली.
हेही वाचा : आयपीएलमध्ये मोठी घडामोड! राहुल द्रविडची IPL मध्ये एन्ट्री, 'या' संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती
शॉट पुटमध्ये तिसरं पदक:
सचिन खिलारी हा मूळचा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या आटपाडी गावातील असून पॅरालिम्पिकमध्ये शॉर्ट पुटमध्ये पदक जिंकणारा तिसरा भारतीय आहे. पॅरालिम्पिकच्या शॉर्ट पुटमध्ये पहिलं पदक हे 1984 में जोगिंदर सिंह बेदी यांनी जिंकलं होतं. त्यावेळी जोगिंदर सिंह बेदी यांनी कांस्य पदकाला गवसणी घातली होती. तर महिला एथलीट दीपा मलिक यांनी 2016 च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकले होते आता 8 वर्षांनी शॉर्ट पुटमध्ये भारताने तिसरं पदक जिंकलं आहे.