Rohit Sharma : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल ( ICC World Test Championship ) सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात आला. 2021 प्रमाणे यंदाच्या Wtc Final मध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या ऐतिहासिक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 रन्सने पराभव केला. दरम्यान या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फारच निराश दिसला. या सामन्यात शुभमन गिलच्या ( Shubman Gill ) दुसऱ्या डावातील विकेटवरून मोठा गदारोळ माजल्याचं दिसून आलं. तर सामना संपल्यानंतर दोन्ही टीमच्या कर्णधारांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं दिसून आलं.


शुभमन गिलच्या विकेटवरून मोठा गदारोळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाच्या दुसऱ्या डावामध्ये स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर ओपनर फलंदाज शुभमन गिल ( Shubman Gill ) ची विकेट गेली. यावेळी शुभमनच्या बॅटला कट लागून बॉल कॅमरून ग्रीनकडे गेला. ग्रीनने देखील खूप एफर्ट्स घेऊन हा कॅच पकडला खरा, मात्र हा कॅच पकडते वेळी बॉल जमिनीला घासला गेल्याचं दिसून आलं. 


रिप्ले पाहिल्यानंतर देखील ग्रीनच्या हातून बॉल जमिनीला स्पर्श करत असल्याचं दिसून आलं. अशा परिस्थितीतही शुभमनला आऊट करार दिल्यामुळे सोशल मीडियावर एकच गदारोळ माजला. यामध्ये अंपायर्सवरही टीका करण्यात आली. दरम्यान हा सामना संपल्यानंतर याच विषयावर रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस ( Pat Cummins ) यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्याचं पहायला मिळालं. 


सामन्यानंतर या कॅचसंदर्भात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला की, शुभमन गिलच्या ( Shubman Gill ) कॅच संदर्भात थर्ड अंपायरने आणखी काही रिप्ले पहायचे होते. त्याचप्रमाणे अजून काही कॅमेरा अँगलने ही विकेट पहायला हवी होती. मात्र त्यावेळी के वळ 1-2 कॅमेरा अँगल दाखवण्यात आला.


रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पुढे म्हणाला की, आयपीएलमध्ये आम्हाला याबाबतीत अधिक अँगल पहायला मिळायचे. त्यावेळी 10 वेगवेगळे अँगल आम्ही पाहिले आहेत. मला एक गोष्ट समजली नाही ती म्हणजे, आयसीसी फायनल मध्ये कोणतंही अल्ट्रा-मोशन दाखवलं नाही, यामुळे मी निराश झालोय.  


दुसरीकडे रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) या वक्तव्यावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंसने ( Pat Cummins ) देखील उत्तर दिलंय. कमिंस म्हणाला, मला तो एक उत्तम कॅच वाटला. आपण फक्त खेळाडू आहोत, त्यामुळे असे निर्णय आपण अंपायरवर सोडून दिले पाहिजेत.


माझ्या मताने, या सामन्यासाठी जगातील सर्वोत्तम अंपायर अंपायरिंग करत होते. त्यामुळे नियम काय आहे, याची त्यांना कल्पना आहे. त्यांनी तो कॅच प्रत्येक अँगलने पाहिला. भावूक चाहत्यांपेक्षा मी अंपायरच्या निर्णयाला अधिक पाठिंबा देईन, असंही कमिंसने म्हटलंय.