PBKS vs DC : `मला थोडीशी भीती वाटतेय कारण…`, 15 महिन्यांनंतर कमबॅक करण्यापूर्वी असं का म्हणतोय ऋषभ पंत?
IPL 2024, PBKS vs DC : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील दुसरा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असणार आहे. तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर आता दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आयपीएलच्या मैदानात दिसणार आहे.
IPL 2024, PBKS vs DC: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामातील एका दिवसात 2 सामन्याला सुरुवात होणार आहे. आजच्या (23 मार्च) दिवसातील पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे. हा सामना महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 3 वाजता नाणेफेकने सुरु होईल. मात्र या सामन्यात टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत तब्बल 15 महिन्यांनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
ऋषभ पंतचा 2022 मध्ये दिल्लीहून रुरकीला जाताना कार अपघात झाला होता. या घटनेनंतर ऋषभ पंत आयपीएल 2023 खेळू शकला नव्हता. मात्र आता तो पुन्हा एकदा ॲक्शनमोडमध्ये परतणार आहे. या आयपीएलमध्ये ऋषभ पंत खेळण्याची शक्यता नव्हती. खेळला तरी केवळ फलंदाज म्हणून मैदानात उतरला असे सांगितले जात होते. मात्र राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने याला पूर्णपणे हिरवा कंदील दिला आहे. परिणामी पंत आयपीएलमध्ये नेतृत्वही करणार आहे.
मात्र आयपीएलच्या 17 व्या हंगामात पुनरागमन करण्यापूर्वी ऋषभ पंतने मोठे वक्तव्य केले आहे. ऋषभ पंतने संघाच्या हंगामातील पहिल्या सामन्याच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, 'मी उत्साही पण आहे, नर्व्हस पण आहे, पण मी आज क्रिकेट खेळणार याचा जास्त आनंद आहेच. आयपीएलचा आजचा पहिला सामना खेळण्याठी मी उत्सुक आहे., असं पंतने माहिती दिली.
आजचा सामना जिंकणार?
दिल्ली आणि पंजाब पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असून दोन्ही संघ गेल्या 16 व्या हंगामात सहभागी होते. दोघांनीही प्रत्येकी एक फायनल खेळली आहे. 2014 मध्ये पंजाबने कोलकात्याकडून तीन गडी राखून पराभूत करून अंतिम फेरी गाठली होती. तर 2020 मध्ये झालेल्या विजेतेपदाच्या सामन्यात दिल्लीचा संघ मुंबईकडून पाच गडी राखून पराभूत झाला होता. पंजाब आणि दिल्ली यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 32 सामने खेळले गेले आहेत. पंजाब 16 मध्ये तर दिल्ली 16 मध्ये जिंकली. मोहालीच्या मुल्लानपूर स्टेडियमवर दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत.
खेळपट्टीचा अहवाल
मोहालीतील नवीन स्टेडियम महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियममध्ये हा सामना रंगणार असून आयपीएलमध्ये पहिल्यांदाच येथे हा सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे खेळपट्टीबाबत काहीही सांगता येणार नाही. तसेच शनिवारी मोहालीतील हवामानाबाबत चांगली बातमी आहे. या दिवशी येथे उष्णता असेल, पावसाची शक्यता नाही. वाऱ्याचा वेग ताशी 11 किलोमीटर राहणार आहे.
दोन्ही संघांचे संभाव्य खेळ-11
दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, जॅक फ्रेझर मॅगेर्क/ट्रिस्टन स्टब्स, कुमार कुशाग्रा (कीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, खलील अहमद आणि एनरिक नॉर्ट्या.
प्रभाव- ललित कुमार.
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा (कीपर), सॅम कुरन, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.