मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 16 वा सामना पंजाब विरुद्ध गुजरात खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरातने 6 विकेट्सने सामना जिंकला. अत्यंत रोमांचक हा सामना झाला. शेवटच्या ओव्हरपर्यंत पंजाब सामना जिंकणार हे निश्चित असताना शेवटच्या 2 बॉलमध्ये समीकरण बदललं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातचा स्टार खेळाडूचं शतक हुकलं पण त्याने टीमला विजय मिळवून दिला. त्याने शेवटच्या दोन बॉलमध्ये अशी कामगिरी केली की बाजीच पलटली. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 189 धावा केल्या. तर गुजरातसमोर 190 धावांचं आव्हान ठेवलं. 


गुजरातला शेवटच्या बॉलमध्ये विजय मिळवून देणारा खेळाडू राहुल तेवतिया आहे. त्याने 2 बॉलमध्ये षटकार ठोकला आणि गुजरातने आपलं लक्ष्य पूर्ण केलं. गुजरातने विजयाची हॅट्रिक केली. तर पंजाबने सामना गमवला. 


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामध्ये गुजरातने तिसरा विजय मिळवला आहे. मयंक अग्रवालला चार सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. गुजरातच्या विजयानंतर पॉईंटटेबलचं समीकरणही बदललं. गुजरात पॉईंट टेबलवर दुसऱ्या स्थानावर आलं.


शुभमन गिलचं शतक हुकलं मात्र त्याने 96 धावा केल्या. साई सुंदर्शन 30 बॉलमध्ये 35 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 18 बॉलमध्ये 27 धावा केल्या आहेत. पंजाबमध्ये शिखर धवन, लिविंगस्टोन यांनी तुफान फलंदाजी केल्याचं पाहायला मिळालं.