मुंबई : आयपीएलमध्ये 52 वा सामना पंजाब विरुद्ध राजस्थान होत आहे. हा सामना दोन्ही टीमसाठी करो या मरोसारखा असणार आहे. दोन्ही टीमना प्लेऑफच्या रेसपर्यंत पोहोचण्यासाठी सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोणती टीम आज जिंकणार याची उत्सुकता जास्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थाननं पंजाब विरुद्धच्या सामन्यात खास रणनीती आखली आहे. प्लेऑफच्या रेससाठी चुरशीची स्पर्धा असताना टीममध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. 


राजस्थान टीमने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला. करुण नायरला टीमबाहेर बसवलं. तर पंजाब विरुद्ध सामन्यासाठी यशस्वी जायसवाल खेळण्याची संधी दिली. करुण नायर सर्वात जास्त फ्लॉप ठरला. 


3 मॅचमध्ये करुण नायरने 16 धावा केल्या. तो आतापर्यंत एकूण 76 मॅच खेळला आहे. यामध्ये त्याने 1496 धावा केल्या तर 10 अर्धशतक त्यांच्या नावावर आहेत. मागच्या 2 सीझनमध्ये तो फ्लॉप ठरला. यंदाच्याही हंगामात त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला टीमबाहेर बसवण्याचा अखेर निर्णय संजूने घेतला. 


राजस्थान टीम प्लेइंग इलेव्हन - जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल आणि कुलदीप सेन


पंजाब टीम प्लेइंग इलेव्हन- जॉनी बेयरस्टो, शिखर धवन, मयंक अग्रवाल (कर्णधार), भानुका राजपक्षे, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा, ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह आणि संदीप शर्मा