नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१२ नंतर एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाहीये. बीसीसीआयकडून पाकिस्तानसोबत खेळण्याला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाहीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातच जोपर्यंत पाकिस्तानच्या सीमेपलीकडून दहशतवादावर नियंत्रण घातले जात नाही तोपर्यंत दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका होणार नसल्याचे भारत सरकारने स्पष्ट केलेय. 


यानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटर जावेद मियांदादचे यांचे म्हणणे आहे की, आता पीसीबीने बीसीसीआयसमोर झुकणे सोडून द्यावे. भारतासोबत न खेळल्याने आमचे काही नुकसा होणार नाहीये. आम्हाला क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. याआधी पाकिस्तानच्या इतर क्रिकेटर्सनीही अशीच विधाने केले होते. 


एकीकडे अधिकारी आणि क्रिकेटर्स अशा प्रकारची विधाने करतायत. तर दुसरीकडे पीसीबीने आयसीसीसमोर बीसीसीआयकडून ७ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केलीये.२०१२नंतर या दोन्ही देशांमध्ये एकही मालिका झाली नाही. २०१५ ते २०२३ पर्यंत ६ द्विपक्षीय मालिका खेळण्याचा करार या दोन्ही देशांमध्ये झाला होता. मात्र या देशांतील संबंधांचा परिणाम क्रिकेट मालिकांवर झाला. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये अद्याप कोणतीही मालिका झालेली नाहीये.


मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानला भारतासोबत एक मालिका न खेळल्याने ६०० कोटी रुपयांचे नुकसान होतेय. टीम इंडियासह मालिका न झाल्याने पीसीबीला एंडोर्समेंटकडून मिळणारी रक्कमही अर्धी होते. दोन्ही देशांदरम्यानच्या मालिकेमुळे पहिले १५ कोटी रुपये रुपये मिळणार होते. यातील अर्धे पैसेच मिळणार.