मुंबई : वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदल सुरू झाले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा करार वाढवणार नसल्याचा निर्णय घेतला. यानंतर आता बोर्डाने मोहम्मद हफीजलाही नव्या करारातून बाहेर ठेवलं आहे. नव्या करारामध्ये अनेक खेळाडूंचं डिमोशन केलं आहे, तर काहींना प्रमोशन देण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०१९-२० सालासाठी क्रिकेटपटूंसोबतचा करार गुरुवारी जाहीर केला. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार करार करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी छोटी आहे. यावर्षी फक्त १९ खेळाडूंसोबत करार करण्यात आला आहे. मागच्यावर्षी हीच संख्या ३३ होती.


याआधी मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर, बॉलिंग प्रशिक्षक अजहर महमूद, बॅटिंग प्रशिक्षक ग्रॅण्ट फ्लॉवर आणि ट्रेनर ग्रांट लुडेन यांचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतला होता. २ ऑगस्टला लाहोरमध्ये पीसीबीची समिक्षा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतल्या शिफारसींनंतर हे निर्णय घेण्यात आले.


पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या कराराची यादी


कॅटेगरी ए


बाबर आजम, सरफराज अहमद, यासिर शाह


कॅटेगरी बी


असद शफीक, अजहर अली, हॅरिस सोहेल, इमाम-उल-हक, मोहम्मद अब्बाास, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, वहाब रियाज


कॅटेगरी सी


आबिद अली, हसन अली, फखर जमान, इमाद वसीम, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिझवान, शान मसूद, उस्मान शिनवारी


हे खेळाडू करारातून बाहेर


शोएब मलिक, फहीम अश्रफ, जुनैद खान, बिलाल आसिफ, साद अली, मीर हमजा, उम्मेद आसिफ, साहिबजादा फरहान, मोहम्मद नवाज, रुम्मान रईस, आसिफ अली, हुसैन तलत, राहत अली, उस्मान सलाउद्दीन


डिमोशन झालेले खेळाडू


फकर जमान (बी वरून सी), मोहम्मद आमिर (ए वरून सी), हसन अली (बी वरून सी)


प्रमोशन झालेले खेळाडू


हॅरिस सोहेल (सी वरून बी), इमाम-उल-हक (सी वरून बी), मोहम्मद अब्बास (सी वरून बी), वहाब रियाज (सीवरून बी), शाहीन आफ्रिदी (ई वरून बी), मोहम्मद रिझवान (ईवरून सी)